Parrikar Science Exhibition: पर्रीकर विज्ञान महोत्सवाला मडगावात उत्स्फूर्त प्रतिसाद

Madgaon: 450 विद्यार्थ्यांचा सहभाग : एरोस्पेस, ॲटोमिक तंत्रज्ञानाची घेतली माहिती
Parrikar Science Exhibition
Parrikar Science ExhibitionDainik Gomantak
Published on
Updated on

science exhibition: डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एफआयआयआरईतर्फे राज्य सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित चौथ्या मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या महोत्सवात मडगावमधील 12 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 450 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दिग्गज व्यक्तींकडून देशाच्या संरक्षणासंदर्भातील एरोस्पेस तंत्रज्ञान व ॲटोमिक लेयर्सबद्दलची माहिती मिळाली.

दोना पावला येथील एनआयओ सभागृहात अधिकृत उद्‍घाटन सोहळ्यानंतर फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या डीआरडीओच्या डायरेक्टर जनलर डॉ. टेसी थॉमस यांच्याकडून एरोस्पेस तंत्रज्ञान व बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरिंधम घोष यांच्याकडून ॲटोमिक लेयर्स तंत्रज्ञानाबद्दलची माहिती सहभागी विद्यार्थ्यांना मिळाली.

डॉ. टेसी थॉमस यांनी एरोस्पेस तंत्रज्ञानामध्ये भारताने जी प्रगती साधली आहे, त्यामुळे भारताचे संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत झाला आहे. भारत स्वतः अनेक विमाने, फायटर विमानांचे उत्पादन करतो. या क्षेत्रात भारत कुणावरही अवलंबून राहिलेला नाही.

भारताच्या संरक्षणात डीआरडीओची भूमिका याबद्दलही त्या बोलल्या. भारत वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे, लांब पल्ल्याच्या अंतराचे उपग्रह, क्षेपणास्त्र स्वतः तयार करीत आहे याची माहिती त्यांनी दिली.

भारतात विज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी व अमुलाग्र उत्क्रांती पाहिली आहे. या आधुनिक जगतातले भारतातील विद्यार्थी ज्ञानाने मोठे होत आहेत. पूर्वीपेक्षा आता शिक्षणात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Parrikar Science Exhibition
Dicholim: खोर्जुवे पदपूल मोडकळीस; नवीन पुलाचा प्रस्ताव

प्रोफेसर घोष यांनी ॲटोमिकची (अणू) संरचना, सिद्धांत, भारतातील ॲटोमिक क्षेत्रातील वाटचाल याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच सध्या देशातील प्रचलीत ॲटोमिक तंत्रज्ञानाबद्दलचीही माहिती दिली. डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीना पाणंदीकर यानी दोन्ही व्यक्त्यांचे स्वागत केले.

मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. टेसी थॉमस यांनी सुरवातच गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आठवणीने केली. ते संरक्षणमंत्री असताना त्यांचे अमुल्य मार्गदर्शन आम्हाला लाभले, असे त्या म्हणाल्या.

भारत देशात एरोस्पेस तंत्रज्ञानाची प्रगती महाभारत, रामायणापासून ते आताच्या आधुनिक जगापर्यंत कशी झाली यावर त्यांनी आपल्या व्याख्यानात भर दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com