OBC Reservation Dainik Gomantak
गोवा

अखेर ओबीसी आरक्षणासह पंचायतीच्या निवडणुका जाहीर

आचारसंहिता लागू : 10 ऑगस्टला मतदान; 12 रोजी मतमोजणी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यभर गाजत असलेल्या आणि न्यायालयाने निर्देश दिलेल्या राज्यातल्या 186 पंचायतींच्या निवडणुका 10 ऑगस्टला, तर 12 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यासाठी आज शनिवारपासून राज्यातील पंचायत हद्दीमध्ये आचारसंहिता लागू झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी दिली. पणजीतील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी सचिव ब्रिजेश मणेरीकर, साहाय्यक निवडणूक संचालक सागर गुरव, डॉ. दुर्गाप्रसाद, आशुतोष आपटे उपस्थित होते.

(Panchayat elections announced with OBC reservation)

रमणमूर्ती म्हणाले, न्यायालयाच्या निर्देशानुसार 12 ऑगस्टपर्यंत पंचायत निवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी 8 लाख 27 हजार 99 मतदार असून यामध्ये 4 लाख 1 हजार 725 पुरुष, तर 4 लाख 25 हजार 372 महिला मतदार आहेत, तर दोन तृतीयपंथी मतदार आहेत. निवडणुकीसाठी 18 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि ती प्रक्रिया 25 जुलैपर्यंत

राज्यात पंचायतीच्या निवडणुका जाहीर

चालू राहील. 26 जुलैला अर्जांची छाननी होईल, तर 27 जुलैला अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल. त्यानंतर 8 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल. यादरम्यान निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरची छपाई होईल.

9 ऑगस्ट हा राखीव दिवस असेल, तर 10 ऑगस्टला मतदान होईल. 11 ऑगस्ट हा मतदानानंतरचा राखीव दिवस असेल. त्यानंतर 12 ऑगस्टला मतमोजणी होईल. या मतदानासाठी 21 निवडणूक अधिकारी, 21 साहाय्यक निवडणूक अधिकारी, 12 विशेष निवडणूक निरीक्षक, तर 21 खर्चासाठीचे विशेष निरीक्षक असतील. या निवडणुकीसाठी दहा हजार कर्मचारी तैनात केले जाणार असून प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त 40 हजार रुपयांची खर्चाची मर्यादा असणार आहे. मतदान बॅलेट पेपरच्या साहाय्याने होईल. या पंचायतीच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जातींच्या उमेदवारांकरिता 21 प्रभाग राखीव ठेवले असून अनुसूचित जमातींकरता 187 प्रभाग तर इतर मागासवर्गीयांकरता 307 प्रभाग आरक्षित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT