Panchayat Election Goa Dainik Gomantak
गोवा

'...तोपर्यंत पंचायतीवर प्रशासक म्हणून स्वयंपूर्ण मित्राची नेमणूक करा'

पंचायत निवडणूक लांबल्याने काणकोणमध्ये जोर धरु लागली मागणी

दैनिक गोमन्तक

काणकोण : पंचायतीच्या निवडणूका होईपर्यत पंचायतीवर प्रशासक म्हणून स्वयंपूर्ण मित्राची नेमणूक करावी अशी मागणी काणकोणातून होऊ लागली आहे.

पंचायत कारभारात पारदर्शकता राखून जनतेला निपक्षपाती सेवा मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी पंचायतीत कार्यरत असलेल्या स्वयंपूर्ण मित्राकडे पंचायत प्रशासकाचा ताबा देण्यात यावा अशी मागणी येथील एक सामाजिक कार्यकर्ते आणि श्रीस्थळ जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सदस्य शिरीष पै यानी एका निवेदनाद्वारे पंचायत मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील पंचायतींचा कार्यकाळ संपायला अवघे चार दिवस असून त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याने पंचायत कारभारा साठी प्रशासक नियुक्त करणे क्रमप्राप्त ठरते.

निवडणूका तोंडावर असताना सरपंचावर ही जबाबदारी दिल्यास त्याचा ब-याच प्रमाणात संभाव्य गैरवापर होण्याची शक्यता आहे.ते टाळण्यासाठी सरकारने प्रत्येक पंचायतींत नियुक्त केलेल्या स्वयंपूर्ण मित्राकडे प्रशासक पदाची जबाबदारी सोपवावी.

सरकारने प्रत्येक पंचायतींत स्वयंपूर्ण मित्र म्हणून सरकारी अधिकारी नियुक्त केलेले आहेत व त्यांना पंचायत क्षेत्रातील कामाचा बराच अनुभव आहे.त्याचप्रमाणे पंचायत क्षेत्रातील अडीअडचणीची पण जाणीव असल्याने काम करणे सोपे होईल त्याचप्रमाणे जनतेलाही निपक्षपाती व चांगली सेवा मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक पंचायतींत अधिकारी शोधून आदेश काढण्या ऐवजी एकाच आदेशाने स्वयंपूर्ण मित्राकडे ताबा सोपविणे अत्यंत सोपे होणार आहे.ते निवडणूकीच्या तोंडावर ते संयुक्तिक ठरते. पंचायत मंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी या विनंतीचा विचार करण्याची मागणी पै यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT