निष्पाप निरागस ‘लकी’ ठरलाय अनलकी...!

शिरोडा खूनप्रकरण : आई गेली, बाप कोठडीत आणि मुलगा ‘अपना घर’मध्ये
Baby Boy
Baby BoyDainik Gomanatak
Published on
Updated on

फोंडा : एकमेकांवर त्यांचे जीवापाड प्रेम... पण या प्रेमाला दोन्ही कुटुंबांचा प्रखर विरोध त्यामुळे आता इथे थांबून काही अर्थ नाही, विरोध करणाऱ्यांपासून दूर कुठे तरी संसार थाटावा आणि स्वतःचं असं विश्‍व तयार करण्याच्या हेतूने त्या दोघांनी ओडिशा येथील आपले घर सोडले आणि सहा वर्षांपूर्वी त्यांनी गोवा गाठले. ओडिशा येथील राजकिशोर नाईक आणि रिता बडाकिया यांच्या जीवनात घडलेली ही हकीकत. एखाद्या कहाणीसारखी… तरीपण शोकांतिका!

खूप छान संसार करण्याची स्वप्ने त्या दोघांनी पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी राजकिशोर आणि रिता यांनी गोव्यात मजुरीचे काम करून संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. भाड्याच्या खोलीतच त्यांनी आपले विश्‍व मांडले, आणि अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या छान चाललेल्या संसारात ‘लकी’ची अँट्री झाली. लकी त्यांचा गोंडस मुलगा. मुलगा झाल्याने राजकिशोर आणि रिताच्या संसार सुखात अधिकच भर पडली. मध्यंतरी कोविड महामारीमुळे रोजगार नसल्याने दोघांच्या संसारात खडतर दिवस आले, तरीही त्यावर मात करीत दोघांनी मजुरी करीत आपला संसार सांभाळला आणि लकीचे संगोपनही व्यवस्थित केले. वर्षभरापूर्वी हे कुटुंब शिरोड्यात आले आणि....!

सहा वर्षांपूर्वीच्या संसाराला येथेच गालबोट लागले. आपल्या पत्नीचे रिताचे अन्य कुणाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयाने राजकिशोरला पछाडले. कदाचित खरे असेल...कदाचित खोटेही असेल....! पण राजकिशोर आणि रिताच्या संसारात आगीची ठिणगी पडली. अलीकडच्या काळात तर रोजच भांडणे व्हायला लागली. मातापिता भांडताना पाहून त्या अडीच वर्षांच्या लकीच्या मनावर काय बरे बेतले असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

Baby Boy
मांद्रे पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकाम थांबवा; स्वराज्य संस्थेची मागणी

आईबाप नसलेला लकी अपना घरमध्ये!

राजकिशोर आणि रिताच्या कुटुंबियांना या खुनासंबंधी आणि छोट्या लकीसंबंधी कळवले आहे, पण आज दहा दिवस झाले तरी ओरिसाहून राजकिशोर आणि रिताच्या कुटुंबियांनी त्याची दखल घेतलेली नाही. पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर आणि पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील सातत्याने संपर्क ठेवून आहेत, पण ‘नो रिस्पोन्स''! त्यामुळे आता पोलिसांना ओरिसात प्रत्यक्ष पाठवण्याशिवाय पर्याय नाही, असे हे अधिकारी सांगतात. एकाचा मृत्यू झाला, एकजण तुरुंगात आहे, आणि निष्पाप मूल मात्र भलत्याच कुणाकडे आहे, एवढे होऊनही... पळून जाऊन लग्न केले ना...मग भोगा आता आपल्या कर्माची फळे...असे या दोघांच्या कुटुंबियांना सांगायचे आहे का...पण मग लकीचे काय...तो तर अनलकी ठरला ना...त्याने कायम अपनाघरमध्ये रहायचे काय...! अजून उत्तर सापडत नाही, फक्त प्रश्‍न!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com