Samarth Rane Dainik Gomantak
गोवा

Premier League Cricket: समर्थ राणेची किलर गोलंदाजी; पणजी जिमखान्याने टाकली नांगी; जीनो स्पोर्टस क्लब मजबूत स्थितीत

Premier League Cricket: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जीनो स्पोर्टस क्लबची सामन्याच्या पहिल्या दिवशी स्थिती भक्कम झाली.

किशोर पेटकर

Premier League Cricket:

युवा गोलंदाज समर्थ राणे याच्या भेदकतेसमोर पणजी जिमखान्याच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जीनो स्पोर्टस क्लबची सामन्याच्या पहिल्या दिवशी स्थिती भक्कम झाली. सांगे येथील जीसीए मैदानावर गोव्याच्या 16 वर्षांखालील संघाचा कर्णधार समर्थ याने 35 धावांत 6 गडी टिपल्याने पणजी जिमखान्याच्या पहिला डाव 141 धावांत संपुष्टात आला. आठव्या विकेटसाठी मनीष काकोडे आणि विजेश प्रभुदेसाई यांनी 40 धावांची भागीदारी केल्यामुळे पणजी जिमखान्याला सव्वाशे धावांचा टप्पा पार करता आला. पहिल्या दिवसअखेर 1 बाद 73 धावा केलेला जीनो संघ 68 धावांनी मागे आहे.

‘एमसीसी’चे युवा फलंदाज चमकले

चिखली-वास्को येथील मैदानावर धेंपो क्रिकेट क्लबविरुद्ध मडगाव क्रिकेट क्लबचे (एमसीसी) युवा फलंदाज चमकले. राहुल मेहता (64), समर दुभाषी (70) आणि पियुष यादव (74) यांच्या अर्धशतकांच्या बळावर एमसीसी संघाने पहिल्या डावात 9 बाद 307 धावा केल्या.

‘साळगावकर’च्या सागरची फिरकी प्रभावी

दरम्यान, पुदुच्चेरीमार्फत रणजी क्रिकेट खेळणारा 37 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज सागर उदेशी (5-54) आणि ईशान मुलचंदानी (4-53) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर साळगावकर क्रिकेट क्लबने पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर चौगुले स्पोर्टस क्लबचा डाव 144 धावांत गुंडाळला. नंतर पहिल्या दिवसअखेर साळगावकर संघाचीही 4 बाद 93 अशी स्थिती झाली.

संक्षिप्त धावफलक

1) पणजी जिमखाना, पहिला डाव: 63.3 षटकात सर्वबाद 141 (आयुष पांडे 20, स्नेहल कवठणकर 20, सत्यजीत बच्छाव 20, मनीष काकोडे 29, विजेश प्रभुदेसाई 22, समर्थ राणे 18-8-35-6, अमूल्य पांड्रेकर 2-15) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव: 26 षटकांत 1 बाद 73 (ज्योतशिल सिंग नाबाद 51, आनंद तेंडुलकर नाबाद 19).

2) मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव: 90 षटकांत 307 (राहुल मेहता 64, समर दुभाषी 70, पियुष यादव 74, सनथ नेवगी 18, दिशांक मिस्कीन नाबाद 30, फेलिक्स आलेमाव नाबाद 12, हेरंब परब 2-38, विकास सिंग 2-90, पार्थ साहनी 4-72) विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब.

3) चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव: 61.3 षटकांत सर्वबाद 144 (रोहन कदम 30, मंथन खुटकर 65, कीथ पिंटो नाबाद 18, सागर उदेशी 5-54, ईशान मुलचंदानी 4-53) विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव: 29 षटकांत 4 बाद 93 (प्रथमेश गावस 42, दीपराज गावकर नाबाद 30, पार्थ भूत 2-30).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

SCROLL FOR NEXT