Premier League Cricket Tournament : पर्वरीत फिरकी दबदबा कायम; दर्शन मिसाळचे 7 बळी

धेंपो सर्वबाद 157, एमसीसी 5 बाद 135
Darshan Misal
Darshan MisalDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावरील फिरकी गोलंदाजांचा दबदबा शनिवारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीतही कायम राहिला. दिवसभरातील सर्व 15 गडी फिरकीवर बाद झाले. आता मडगाव क्रिकेट क्लब (एमसीसी) धेंपो क्रिकेट क्लबवर आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

एमसीसी संघाचा कर्णधार डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याने अतिशय भेदक मारा करताना 46 धावांत 7 गडी बाद केले. त्यामुळे धेंपो क्लबचा पहिला डाव 157 धावांत आटोपला.

Darshan Misal
Nitu Ghanghas नंतर Saweety Boora ने जिंकले सुवर्णपदक, चीनी खेळाडूला पाजले पाणी

नवव्या क्रमांकावरील दीप कसवणकर याच्या झुंजार नाबाद अर्धशतकामुळे धेंपो क्लबचा दीडशतक गाठता आले. त्यानंतर एमसीसी संघाचीही पहिल्या दिवसअखेर 5 बाद 135 अशी घसरगुंडी उडाली. ते अजून 22 धावांनी मागे आहेत.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 53.5 षटकांत सर्वबाद 157 (विकास सिंग 22, लक्षय गर्ग 23, दीप कसवणकर नाबाद 50, दर्शन मिसाळ 7-46, कीथ पिंटो 2-78, वेदांत नाईक 1-7) विरुद्ध मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव : 40 षटकांत 5 बाद 135 (शंतनू नेवगी 20, शौर्य जगलन 37, पियुष यादव नाबाद 38, दर्शन मिसाळ नाबाद 12, विकास सिंग 2-49, रोहन बोगाटी 2-45, यश पोरोब 1-17).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com