Goa Women's Premier League Cricket: प्रीमियर लीगमध्ये एमसीसी महिलांची घोडदौड

जीनोवर मात: श्रेयाचे नाबाद अर्धशतक, गौतमीची फटकेबाजी
Premier League Cricket
Premier League CricketDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Women's Premier League Cricket सलामीची श्रेया परब हिचे नाबाद अर्धशतक, तसेच गौतमी नाईक हिची फटकेबाजी या बळावर एमसीसी संघाने गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी स्पर्धेत घोडदौड राखताना जीनो ड्रॅगन्सवर आठ विकेट राखून सहज मात केली. सामना पर्वरी येथील जीसीए मैदानावर झाला.

सामन्याची मानकरी ठरलेल्या श्रेयाने 58 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. पुण्याची, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये नागालँडकडून खेळणाऱ्या गौतमी हिने तडाखेबंद फलंदाजी करताना सहा चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.

गौतमी व श्रेया जोडीने एमसीसी संघाला 10.4 षटकांत 78 धावांची सलामी दिली, त्यामुळे 117 धावांचे विजयी लक्ष्य 18.4 षटकांत 2 विकेट गमावून पार करणे शक्य झाले. एमसीसी संघाने रविवारी पणजी जिमखान्यावर विजय नोंदविला होता.

जीनो ड्रॅगन्सने रविवारी व्हेंचर इलेव्हनला चुरशीच्या लढतीत नमविले होते. सोमवारी एमसीसी संघाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे जीनोला 8 बाद 116 धावांचीच मजल मारता आली. त्यांच्या डावात पूर्वजा वेर्लेकरने 35, तर कर्णधार अनुजा पाटीलने 34 धावा केल्या, मात्र त्यांना धावगती उंचावणे शक्य झाले नाही.

Premier League Cricket
Football News : भारतातील फुटबॉल गुणवत्ता आश्वासक : विकास धोरासू

व्हेंचरविरुद्ध अर्धशतकासह विजयाची शिल्पकार ठरलेली इब्तिसाम शेख लवकर बाद झाली. जीनोच्या फलंदाजीवर अंकुश राखण्याचे श्रेय एमसीसी संघाच्या गोलंदाजांना जाते. सिद्धी नवासे हिने 26 धावांत 3, तर तन्वीर शेख हिने 18 धावांत 2 गडी बाद केले. केशा पटेल हिने चार षटकांत फक्त १७ धावा दिल्या.

Premier League Cricket
I-League Football: एफसी गोवाने नोंदविला पहिला विजय

संक्षिप्त धावफलक

जीनो ड्रॅगन्स ः 20 षटकांत 8 बाद 116 (किरण नवगिरे 10, पूर्वजा वेर्लेकर 35, इब्तिसाम शेख 11, अनुजा पाटील 34, तनया नाईक नाबाद 10, तन्वीर शेख 2-18, केशा पटेल 1-17, गौतमी नाईक 1-21, सिद्धी नवासे 3-26, श्रेया परब 1-12) पराभूत वि. एमसीसी ः 18.4 षटकांत 2 बाद 117 (गौतमी नाईक 43, श्रेया परब नाबाद 51, सुनंदा येत्रेकर नाबाद 13, अनुजा पाटील 1-18, पूर्वजा वेर्लेकर 1-12).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com