canacona Balaram Charitable Foundation Dainik Gomantak
गोवा

श्रम-धाम योजना; काणकोणात बलराम फाऊंडेशनतर्फे गरिबांसाठी घरे

नोडल अधिकारी : काणकोणात बलराम फाऊंडेशनतर्फे गरिबांसाठी घरे

Anil Patil

Panaji : ‘देणाऱ्याचे हात हजार’ या उक्तीचा अनुभव सध्‍या काणकोणमध्ये येत आहे. तेथील बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने राज्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी म्हणून गणली जात असलेल्या ‘श्रम-धाम’ योजनेअंतर्गत डोक्यावरचे छप्पर फाटलेल्या आणि हरविलेल्यांना नवीन घरे बांधून देण्यात येत आहेत. या उपक्रमाला राज्यातील स्वयंपूर्ण मित्र नोडल अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर प्रकल्प राज्यासाठी प्रेरणादायी आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

काणकोण तालुका हा तसा दुर्गम आणि डोंगराळ भूभाग. समुद्रकिनारपट्टीला लागून असल्याने येथील अनेक लोक मासेमारी उद्योगावर निर्भर आहेत. तर काहीजण जंगलामध्ये मिळणारी विविध उत्पादने मिळविण्यासाठी प्राधान्य देतात. मात्र प्रामुख्याने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हा अर्थार्जनाचा मुख्य स्त्रोत आहे.

त्यामुळे उत्पन्नाचा विचार केला तर इथल्या बहुतांश नागरिकांचे उत्पन्न हे कमी उत्पन्न गटातीलच आहे. रोजंदारीच्‍या उद्योगधंद्यांतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर लोकांची गुजराण चालते. त्यामुळे माणसाचा मूलभूत हक्क, अगदी महत्वाचे स्वप्न असणारे घर आणि निवारा अनेकांच्या वाट्याला नाही.

सरकारी योजनांचा लाभ काहींना मिळाला, पण अनेकांना या योजना लागू होत नाहीत. हे लोक गेल्या अनेक वर्षांपासून इथे पडणाऱ्या धोधो पावसाला आणि रोजच उगवणाऱ्या सूर्याला सरळ घरात आसरा देतात. पण हे जीवघेणे जीणे किती दिवस जगावे? याची दखल घेऊन श्री बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रम-धाम योजना साकारली. याचे सर्वेसर्वा आहेत विद्यमान आमदार तथा सभापती रमेश तवडकर. काणकोण परिसरात ज्यांना आपले हक्काचे घर नाही किंवा जे आहे ते मोडलेले आहे आणि त्याची दुरुस्ती करणे शक्य नाही, अशा लोकांना शोधून त्‍यांना पक्के घर बांधून देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. विशेष म्‍हणजे ही घरे ते नागरिकांच्या सहकार्यातूनच बांधून देत आहेत.

मान्‍यवरांनी उधळली स्‍तुतिसुमने

आयटी खात्याचे संचालक लेविन्‍सन मार्टिन्स म्हणाले की, ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. सामान्य माणसाला त्याच्या घराचे स्वप्न साकारण्यास मदत करत आहे. अशी लोकसहभागातून आसरा निर्माण करणारी योजना सरकारने राबवली पाहिजे. निवडणूक अधिकारी आयेशा वायंगणकर म्हणाल्या, ही योजना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्‍यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. कारण बेघर असणाऱ्या अनेकांना हक्काचे घर मिळेल. तर, क्रीडा संचालक अजय गावडे म्हणाले, लोकसभागातून निर्माण झालेली कामे इतरांना प्रेरणादायी ठरतातच शिवाय संबंधित लाभार्थीना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देतात. ही योजना अधिक व्यापक झाली तर सामान्य गोरगरीब आणि तळागाळातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल.

एक दिवस आणि एक रुपया द्या

‘एक दिवस आणि एक रुपया द्या’ अशी या योजनेची संकल्‍पना आहे. त्‍यानुसार या श्रमदानातून हे श्रम-धाम योजना साकारली जात आहे. त्‍यास सहकार्य करण्‍यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, मामलेदार, वीज कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध स्तरांतील लोक पुढे येत आहेत. या योजनेची माहिती करून घेण्यासाठी राज्य सरकारच्या महत्त्‍वाकांशी स्वयंपूर्ण मित्र नोडल अधिकाऱ्यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली.

समाजात असे अनेक लोक आहेत, ज्यांना रोजच्या जीवनमरणाचे प्रश्न भेडसावत असतात. मग घरासारखी बाब दुय्यम बनते आणि ते आयुष्यभर जीवघेणे आयुष्य जगत राहतात. हे संपविण्यासाठीच लोकसभागातून सामान्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याकरिता आम्ही श्रम-धाम योजना राबवत आहोत. लोकांनीही या सेवा कार्यात सहभागी व्हावे.

- रमेश तवडकर, सभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT