Panaji News : बालभवन घडवतेय भावी पिढी

राज्‍यात 52 केंद्रे : सुमारे 5 हजार विद्यार्थी करतात विविध कला आत्‍मसात
Children participating in various activities organized by Bal Bhavan
Children participating in various activities organized by Bal BhavanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोमंतभूमीला कला, साहित्य, नाट्य, नृत्य, संगीत अशा विविधांगी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. गोव्यातील अनेक कलाकार देशपातळीवर तसेच जागतिक स्तरावर नावलौकीक प्राप्त करत आहे. त्यापैकी अनेक कलाकारांच्या जडणघडणीत गोव्यातील बालभवन केंद्रांचा महत्त्वाचा वाटा आहे.

राज्यातील अनेक विद्यार्थी कलेच्या क्षेत्रातील बाराखडीचा श्रीगणेशा हा राज्यभरात पसरलेल्या बालभवनांद्वारे करत असतात. गोव्यात एकूण 52 बालभवन केंद्र आहेत व त्‍यातून सुमारे 5 हजार विद्यार्थी तबला, हार्मोनियम, आधुनिक कला, हस्तकला, गिटारवादन, नाट्य, संगीत अशा विविधांगी कलांचे शिक्षण घेत आहेत.

५ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना मिळतो प्रवेश

  • बालभवन केंद्रात 5 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांना अर्ज करून तसेच अल्प शुल्क भरून प्रवेश मिळविता येतो. या केंद्रांद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

  • विद्यार्जनासोबतच कलेचे शिक्षण मिळाल्याने आयुष्य समृद्ध होते. लॉकडाऊनमध्‍ये बालभवनच्या या उपक्रमात खंड पडू नये म्हणून प्रशिक्षकांद्वारे वेगवेगळया विषयांचे ‘व्हिडीओ लेसन’ तयार करण्यात आले होते.

  • गोवा युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने हस्तकला, चित्रकला विषयांचे व्हिडीओ तयार करून ते यू-ट्युब चॅनलवर प्रसारित करण्यात आले. मुलांसाठी हे शैक्षणिक व्हिडीओ आजही बालभवनच्या यू-ट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत. कोविड काळात संगीत व इतर क्षेत्रात कार्यरत असणारी गोव्यातील बालभवन ही एकमेव संस्था होय.

Children participating in various activities organized by Bal Bhavan
Bicholim Art : समृद्ध कलेचा वारसा पुढे न्यावा - विजयकुमार
Children participating in various activities organized by Bal Bhavan
Children participating in various activities organized by Bal BhavanDainik Goamantak

‘गुणदर्शन’चे 42 कार्यक्रम

एप्रिल-मे महिन्याच्या सुट्टीत मुलांना विविध कलांचा आनंद लुटता यावा या उद्देशाने पणजी बालभवतर्फे उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यंदा राज्‍यभरातील 52 केंद्रातील सुमारे 6 हजार मुलांनी या शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराचाच एक भाग म्हणून बालभवन केंद्रामधून 30 एप्रिल ते 24 मेपर्यंत ‘गुणदर्शन’चे तब्‍बल 43 कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने मुलांचा व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय ‘अपना घर’मधील मुलांसाठी बालभवनतर्फे विशेष उन्हाळी शिबिर घेण्यात आले.

Children participating in various activities organized by Bal Bhavan
Goa Budget For Art and Culture Department: कला समृद्ध गोव्याच्या कला आणि संस्कृती खात्यात सरकारच्या नवीन घोषणा
Children participating in various activities organized by Bal Bhavan
Children participating in various activities organized by Bal BhavanDainik Gomantak

मुलांच्या उपजत कलागुणांचा विकास साधून त्‍यांना सर्वोत्तम व्यासपीठ देण्याचे काम बालभवन कटाक्षाने करीत आहे. बालभवन ही मुलांमधील सृजनशिलतेला प्रोत्साहन देणारी एकमेव संस्था आहे. त्यामुळे गोमंतकीय नागरिकांनी आपल्या पाल्यांना आवर्जून बालभवन केंद्रात पाठवावे, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होण्‍यास मदत होईल.

- दयानंद चावडीकर, बालभवन केंद्राचे संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com