Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ऊन सरीसारखं भिजवतं; शिळी भाकर होते ‘व्‍हिटॅमिन’

Panaji News : आम्‍हालाही ‘एसी’त बसावसं वाटतं; पण शिकलो नाही ना!

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, डोक्‍यावर सूर्य आग ओकू लागल्‍यावर चार भिंतींच्‍या आत बसलेले जीव कासावीस होतात.

त्‍याचवेळी राजधानी पणजीचे रूपडे ‘रेखाटणारे’ शेकडो पाय अक्षरश: तापलेल्‍या तव्‍यावरून धावत असतात. ‘यावर्षी अतीच आग होतेय’ या वाक्‍याची चेष्‍टा केल्‍यागत! ऊन सरींसारखं अंग भिजवत असतं. अशावेळी शिळी भाकर होते ‘व्‍हिटॅमिन’! कसे जगतात हे मजूर? काय आहेत त्‍यांच्‍या जाणिवा?

‘जीवनशैली आणि श्रमाने घडविलेला टोकाचा फरक जन्‍माला येतो केवळ मजबुरीतून! आम्‍हालाही वाटतं एअरकंडिशन ऑफिसात बसावं. पण आम्‍ही बुकं शिकलो नाही. म्‍हणून पोटासाठी राबतोय. पैसे चांगले मिळतात. सवय झालीय आता. मुलांना मात्र ‘साहेब’ बनलेलं बघायचंय.

त्‍यांना शिकवतोय’, आल्‍तिनो-पणजी येथील सरकारी सदनिकांजवळ काम करणारा, उतार वयाकडे झुकलेला रामप्‍पा सांगत होता. कुणीतरी आपल्‍याशी आपुलकीने बोलते आहे, या जाणिवेने तो हळवा झाला. अनाहुतपणे बोलता-बोलता मजुरांचे कडू-गोड अंतरंग, जगण्‍याचा संघर्ष त्‍याने उलगडला. भरभरून बोलणाऱ्या रामप्‍पाला पाहून त्‍याचे आणखी चार साथीदार ‘टीम गोमन्‍तक’शी बोलण्‍यास स्‍वत:हून पुढे आले.

राब राब राबतात; काय मिळतो मेहनताना?

‘स्‍मार्टसिटी’चे काम करण्‍यासाठी ठेकेदारांनी झारखंड, बिहार, ‘यूपी’तून कामगार आणले. प्रतिदिन ६०० ते ८०० रुपये त्‍यांना वेतन दिले जाते. आठवड्यातून एकदा/महिन्‍याच्‍या अखेरीला अशा दोन्‍ही पद्धतीने वेतनाचे वितरण होते.

निवास, रेशन, गॅस, पाणी याची सोय ठेकेदार करतो. काहीवेळा सारे सुरळीत चालते; मात्र बऱ्याचदा गैरसोयी नित्‍याच्‍याच.

आरोग्‍य सांभाळणे जिकिरीचे ठरते. काही अडचण आलीच तर ठेकेदार वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेतात.

दोन टोकांवरून होतो नात्‍यांचा उत्‍सव; शरीरधर्माची आबाळ

रामप्‍पा सांगतो, वर्षातील आठ महिने मजुरीचे काम चालते. घरापासून दूर राहावे लागते. घरच्‍यांची आठवण येते. पण कामासाठी बाहेर पडणे अपरिहार्य असते. नात्‍यातील लोकांसोबत, मुलांसोबत वेळ घालवावा, असे नक्‍कीच वाटते. पण दोन टोकांवर राहून नात्‍यांचा आनंद घ्‍यावा लागतो.

लग्‍न झाल्‍यावर पत्‍नीला गावी ठेवून काम करणारे खूपजण आहेत. माझाही तोच अनुभव. तरुणपणी पत्‍नीची भावनिक, शारीरिक जवळीक खूप हवी वाटायची. त्‍या पूर्ततेअभावी कुचंबणा व्‍हायची. नंतर मात्र विरहाची सवय झाली. मला ६ मुले आहेत. इथे कमवतो, घरी रक्‍कम पाठवतो, असा अनुभव गवंडी ज्‍वालाप्रसाद यांनी सांगितला.

माझा नातू वारला, तेव्‍हा आमचा ठेकेदार मेहबूब अख्‍तर याने विमानाचे तिकीट काढून मला रांचीला पाठवले, अशा आठवणीला उजाळा देताना ज्‍वालाप्रसादने सुहृदयी माणसेही असतात, असे ठासून सांगितले.

जोड्याने काम;

मुले मुकतात शिक्षणाला : मध्‍य प्रदेशातील काही दाम्‍पत्‍य एकत्र मजुरी करतात. पत्‍नीला प्रतिदिन ५००, तर पतीला ७०० रुपये दिले जातात. त्‍यांच्‍यासोबत मुलेही असतात. दुर्दैवाने त्‍यांच्‍या शिक्षणाची मात्र आबाळ होते. फिरत्‍या मजूर दाम्‍पत्‍यांची ही शोकांतिका आहे.

‘यांना’ किंमत अधिक :

कमी वेळेत अधिक व दर्जेदार काम करणाऱ्यांना ‘किंमत’ अधिक आहे. जेसीबी, पोकलॅन ऑपरेट करणाऱ्या कुशल व्‍यक्‍ती अपेक्षित संख्‍येने मिळत नाहीत. अशा ऑपरेटरना प्रतिमहा ३० ते ३५ हजार रुपये वेतन दिले जाते. त्‍यात महाराष्‍ट्रातील तरुण प्रामुख्‍याने दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AFC Champions League: FC Goa भिडणार रोनाल्डोच्या टीमशी! अल नस्सरविरुद्ध परतीचा सामना; सौदी अरेबियन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान

Edberg Pereira Assault: पोलिसांकडून मारहाण झालेल्‍या 'एडबर्ग'ची प्रकृती बिघडली! ICUत केले दाखल; प्रकरण क्राइम ब्रँचकडे सुपूर्द

C K Nayudu Trophy: 17 चौकार, 13 षटकार! 'शिवेंद्र'च्या तडाख्यामुळे गोवा सुस्थितीत; मेघालयाविरुद्ध 270 धावांची आघाडी

Goa Accident Death: भरधाव टँकर येऊन आदळला, कारचा चक्काचूर; दोघाजणांच्या अपघाती मृत्यूमुळे क्रीडाक्षेत्रात हळहळ

Goa Crime: अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी 'मास्टरमाईंड'ला 7 दिवसांची पोलिस कोठडी, संशयित बंगळूरुतून अटकेत; डिचोली पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT