Goa: विनाहात पायाचे मूल जन्माला येईल, 15 वर्षापूर्वी डॉक्टर म्हणाले होते पुन्हा विचार करा; पण मुलाने चमत्कार केला

Goa Success Story: जोशुआने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत 82.8 टक्के गुण मिळवत जगात काहीच अशक्य नसल्याचा संदेश दिला आहे.
Joshua Betsalel D'Cruz
Joshua Betsalel D'Cruz
Published on
Updated on

Goa Success Story

पंधरा वर्षापूर्वीची गोव्यातील गोष्ट आहे. एक महिला गरोदर होती पण तिच्या पोटातील मूल अपंग असल्याची माहिती डॉक्टरांनी तिला दिली. मूल जन्माला आले तरी त्याला पाय आणि हात नसेल असे तिला सांगण्यात व पुढे जाण्यापूर्वी एकदा विचार करा असा सल्ला देखील देण्यात आला.

पण, महिलेने मुलाला जन्म द्यायचा असे ठरवले आणि त्याच मुलाने अलिकडेच दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत एकप्रकारे चमत्कारच घडवला.

बबिता डिक्रूझ असे या महिलेचे नाव आहे तर जोशुआ डिक्रूझ असे तिच्या 16 वर्षीय मुलाचे नाव आहे. जोशुआला जन्मत: दोन्ही पाय नाहीत तर त्याचा एक हात पूर्णपणे विकसित झालेला नाही. जन्मानंतर मुलाचे आयुष्य आव्हानात्मक असेल, असे सर्वजण म्हणत होते. पण, त्याच्या कुटुंबियांनी हे आव्हान स्वीकारुन मुलाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

जोशुआने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत 82.8 टक्के गुण मिळवत जगात काहीच अशक्य नसल्याचा संदेश दिला आहे. जोशुआला पुढे जाऊन कॉमप्युटर सायन्स विषयात शिक्षण घ्यायचे आहे, अशी माहिती द्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिली.

Joshua Betsalel D'Cruz
Goa School Reopening: 'इगो' बाजुला ठेवा! शाळा उशिराने सुरु करण्याबाबत दुर्गादासांची मुख्यमंत्र्यांना पुन्हा विनंत

महत्वाची बाब म्हणजे जोशुआने सर्व पेपर स्वत:च लिहले भूमितीच्या पेपरला त्याला उजव्या हाताच्या दोन बोटांची मदत झाली असेही त्याने सांगितले. परीक्षेच्या काळात दररोज सकाळी चार वाजता उठून तो अभ्यास करायचा, दररोज 14 तास त्याने अभ्यास केल्याची माहिती वृत्तपत्राला दिली. याकाळात विरंगुळा म्हणून तो गिटार वाजवत असे.

बस्तोडा येथील होली क्रॉस शाळेत तो इयत्ता तिसरी पासून शिक्षण घेत होता. शाळेने त्याला सर्व प्रकारची मदत मिळेल याची काळजी घेतली. त्याच्यासाठी विशेष बैठक व्यवस्था देखील निर्माण करण्यात आली होती. त्याला दहावीत अधिक गुणांची अपेक्षा होती मात्र तो खूष असल्याचे त्याने वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com