Panaji Waterlogging Dainik Gomantak
गोवा

Panaji Water Logging: मुसळधार पावसाचे पाणी साचल्याने दुकानदारांची कोंडी; पणजीतील समस्येवर महापौरांकडून दिलगिरी

Heavy Rain Goa: रविवारी रात्री पणजी शहरातील १८ जून मार्गावर आणि रेगो बार, तसेच मळा परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: रविवारी रात्री पणजी शहरातील १८ जून मार्गावर आणि रेगो बार, तसेच मळा परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे रस्त्यालगतच्या दुकानदारांना त्याचा त्रास सहन करावा लागला. या पाणी साचण्याच्या घटनेमुळे सोमवारी महापौर रोहित मोन्सेरात यांनी दुकानदारांची माफी मागितली आहे.

महापौर मोन्सेरात यांनी सांगितले की, समुद्राला असलेली भरती आणि मुसळधार पाऊस यांच्या एकत्रित परिणामामुळे पणजी शहरात पाणी साचले. पाटो परिसरातील गटार व इतर कामांच्या खर्चाचा एक प्रस्ताव महानगरपालिकेने वित्त विभागाकडे सादर केला होता; परंतु तो फेटाळण्यात आला. ‘रेगो बार’सारख्या काही भागांमधील रस्ते पूर्णपणे खोदून दुरुस्त करणे आवश्यक आहे आणि हे काम केवळ पावसाळ्यानंतरच करता येईल.

ज्या भागांची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या कामांना उद्यापासून सुरवात केली जाईल. शहरातील ‘डीबी’ मार्ग, १८ जून मार्ग आणि आत्माराम बोरकर मार्गाचे काम होणे बाकी आहे, ते पावसाळ्यानंतरच केले जाईल. काल पाणी साचल्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके त्वरित ठिकठिकाणी गेली होती. पाण्याचा निचरा होईल, ती जागा त्वरित त्यांनी मोकळी केली. त्यामुळे काही वेळात साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याचे रोहित यांनी सांगितले.

शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत, त्याचा फटका दुकानदारांना झाला आहे, त्याबाबत आपण दिलगीर आहोत, असे सांगत रोहित यांनी पाणी साचण्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, असेही नमूद केले. ताळगाव मतदारसंघातील जनतेबरोबर आई जेनिफर मोन्सेरात यांचे आमदार म्हणून ऋणानुबंध जोडले गेले आहेत.

त्यांचा वारसा आपण पुढे नेण्याची आपली इच्छा आहे; परंतु उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाचा आहे. पक्षाने संधी दिली तर ताळगावातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले. महानगरपालिकेत महापौर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ताळगाव मतदारसंघाशी आपल्या कुटुंबाचे दीर्घकाळापासून राजकीय नाते आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची आपली इच्छा आहे.

मात्र, पक्ष हा सर्वांत महत्त्वाचा असून, त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्यास आपण तेथे आव्हान स्वीकारू. दरम्यान, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांताक्रुझ मतदारसंघात कार्यालय सुरू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापाठोपाठ आता त्यांचे पुत्र आणि महापौर रोहित मोन्सेरात यांनी ताळगावातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यांची आई जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनामुळे ताळगावची विधानसभा सदस्याची जागा रिक्त झाली आहे.

MS Dhoni Bike Ride: क्रिकेटनंतर आता रेसिंगची क्रेझ! धोनीच्या बाईक राईडचा Video Viral; स्टाईल पाहून चाहते झाले फिदा

World Cup 2027: टीम इंडियाची तयारी सुरू! 'या' 7 स्टार खेळाडूंचं विश्वचषकातील स्थान जवळपास पक्कं, रोहित-विराट खेळणार?

Orwellian Democracy: 'ऑर्वेलियन लोकशाही' ते आजचा डिजिटल सर्व्हेलन्स

Horoscope: मंगळवारी कर्क, सिंहसह 'या' 4 राशींना धनलाभाचे प्रबळ संकेत; मंगळागौरीच्या दिवशी शुभ योगांचा विशेष प्रभाव

खरी कुजबूज: मराठ्यांकडून विचार 'नोटा'चा ?

SCROLL FOR NEXT