Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : पणजीतील सुवासिनींची ताडमाड येथे गर्दी; वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा

Panaji News : काकुलो जंक्शन खुला केल्याने चांगली सोय

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, सांतिनेजमधील ताडमाड परिसरातील देवस्थानच्या ठिकाणी शुक्रवारी पहाटेपासून सुवासिनींनी गर्दी केली.

वडाच्या खोडामध्ये असलेले मंदिर आणि वटपौर्णिमा यामुळे सुवासिनींनी वडाला दोरा बांधण्यासाठी आणि तेथील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पणजी, ताळगाव परिसरातील सुवासिनींनी उपस्थिती लावली.

आठवड्यापूर्वी ताडमाड मंदिरासमोरील चेंबरचे सुरू असलेले काम आणि बाजूचे गटार खचले होते. पावसामुळे गटाराखाली माती वाहून गेल्याने गटार खचले. ही घटना घडल्याचे समजल्यानंतर महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक. बाबूश मोन्सेरात यांच्या स्वीयसाह्यक ही मंडळी घटनास्थळी पोहोचली.

त्यावेळी महापौरांनी कंत्राटदाराला वटपौर्णिमेपूर्वी मंदिरासमोरील भाग व्यवस्थित करून देण्याची सूचना केली होती.

त्यानुसार कंत्राटदाराने ताडमाड मेदिरासमोर रस्त्यावर पेव्हर्स घातले. त्याशिवाय मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासमोरील (एसटीपी) पुलापर्यंत वाहतुकीसाठी रस्ता तयार केला. रविवारी सायंकाळी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) काकुलो जंक्शन वाहुतकीस खुला केल्याने आज वटपौर्णिमेच्या पुजेला येणाऱ्या महिलांची चांगली सोय झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Astrology Today: बुधादित्य योगामुळे धनलाभ आणि नव्या संधी; वृषभ, मिथुनराशीसोबत 'या' लोकांसाठी अत्यंत लाभदायक दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहाला ‘मानवाधिकार’ने फटकारले! शौचालयांमध्ये दरवाजांचा अभाव; जॅमरसह सीसीटीव्‍हींची शिफारस

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, कशी होणार रे विरोधी आघाडी!

Goa live News: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या नवीन अधीक्षक म्हणून सुचेता बी. देसाई यांची नियुक्ती

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT