Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : दोन अल्पवयीन मुलींवर गोव्यातील हॉटेलमध्‍ये लैंगिक अत्याचार, एकाला अटक

Goa Crime News: एका १५ वर्षीय मुलीशी एका १७ वर्षीय मुलाने मैत्री करून तिला फूस लावून एका हॉटेलवर नेले आणि लैंगिक अत्याचार केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

उत्तर गोव्याच्या किनारी भागातील हॉटेलमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्‍याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ही दोन्‍ही वेगवेगळी प्रकरणे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद नाझीम (२४) याला गजाआड केले असून दुसऱ्या १७ वर्षीय अल्‍पवयीन संशयिताची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. अत्‍याचाराला बळी पडलेली एक मुलगी १३ वर्षांची तर दुसरी १५ वर्षांची आहे.

पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका १५ वर्षीय मुलीशी एका १७ वर्षीय मुलाने मैत्री करून तिला फूस लावून उत्तर गोव्याच्‍या किनारी भागातील एका हॉटेलवर नेले आणि तेथे तिच्‍यावर लैंगिक अत्याचार केला.

याबाबत त्या मुलीच्या कुटुंबीयांनी १७ मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

अशीच आणखी एक घटना २१ मे रोजी घडली. २४ वर्षीय मोहम्मद नाझीम या मूळ उत्तर प्रदेश येथील युवकाने एका १३ वर्षीय मुलीशी मैत्री केली व नंतर एक हॉटेलमध्ये नेऊन तिच्‍यावर लैंगिक अत्याचार केला. 

मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करताना संशयिताला अटक करून पीडित मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT