Goa News: राज्यातील अनेक भागांमध्‍ये बत्तीगुल, उकाड्यामुळे लोक हैराण; पर्वरी, केपे, पणजीत खेळखंडोबा

Goa News: अवकाळी पावसाचा मारा सुरू असतानाच राज्‍याच्‍या विविध भागांत वीज प्रवाह सातत्‍याने खंडित होत आहे.
As the heat rises in Goa the citizens of Porvorim Quepem Panaji are suffering due to power cut
As the heat rises in Goa the citizens of Porvorim Quepem Panaji are suffering due to power cutDainik Gomantak

Goa News: अवकाळी पावसाचा मारा सुरू असतानाच राज्‍याच्‍या विविध भागांत वीज प्रवाह सातत्‍याने खंडित होत आहे. हवेत उष्‍मा वाढला असताना बत्तीगुल होत असल्‍याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पर्वरी, केपे, राजधानी पणजी भागात विजेचा खेळखंडोबा सुरू होता.

पर्वरी येथील सर्वच भागांत सायंकाळी तब्बल दोन तास बत्ती गुल झाली. उच्च दाबाच्या वाहिन्यांत बिघाड झाल्याने ही स्थिती उद्भवली होती. परिणामी ७.३० ते ९.३० असे दोन तास पर्वरी तसेच पिळर्ण परिसर काळोखात होता. मॉल दी गोवा याठिकाणी असलेल्या वीज यंत्रणेत बिघाड झाल्‍याचे निमित्त झाले.

As the heat rises in Goa the citizens of Porvorim Quepem Panaji are suffering due to power cut
Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; केपे परिसर अंधारात

केपे बाजार परिसर आणि तिळामळ या परिसराला वीज पुरवठा करणारा शेल्डे वीज केंद्रावरील मुख्य ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने संपूर्ण रात्रभर केपे परिसर काळोखात राहिला. उकाडा वाढलेला असताना पूर्ण रात्र लोकांना पंखा, एसीशिवाय काढावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com