Panaji Traffic Issue
Panaji Traffic Issue Gomantak Digital Team
गोवा

Panaji Traffic Jam: वाहतूक कोंडी कायम

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Traffic Jam : सरकारने अटल सेतू अचानक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पणजीत पुन्हा वाहतुकीची कोंडी सुरू झाली आहे.

ही कोंडी कमी करण्यासाठी सिग्नल बंद ठेवून जंक्शनच्या ठिकाणी वाहनांच्या लागणाऱ्या रांगा बघून त्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

आज मंगळवारी देखील येथे वाहतूक कोंडी झाली होती. डांबरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत पूल बंद असल्याने चालक, प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

अटल सेतू हा पुढील काही दिवस बंद असल्याने लोकांनी नेहमीच्या वेळेपेक्षा अगोदर घरातून बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते.

त्यानुसार नोकरदार, तसेच दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थी वेळेवर पोहोचण्यासाठी एक तासापूर्वीच घरातून निघाले.

ऐन दुपारच्या कडकडीत उन्हात दुचाकीस्वारांना संथगतीने वाहने हाकून जावे लागत असल्याने उष्म्याचा फटका बसला.

दिवसभरातील वाहतूक व्यवस्था

1.मंगळवारी सकाळी पणजीहून पर्वरीकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी नव्हती. मात्र, उलट दिशेने येणाऱ्या वाहनांची लागलेली लांब रांग संथगतीने पुढे सरकत होती.

2.मांडवी पुलाच्या अगोदर असलेल्या पर्वरी जंक्शनवर नव्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांसाठी अडथळा लावून एक रांग केल्याने वाहने एकामागोमाग धावत होती.

3.पणजी कदंब बसस्थानकाजवळील नव्याने बांधण्यात आलेल्या सर्कलजवळ मेरशी येथून येणाऱ्या वाहनांची गर्दी झाली होती. या सर्कलला वळसा घेताना कोंडी झाली.

4.संभाव्य वाहतूक कोंडीची ठिकाणे लक्षात घेऊन तेथे अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. दुपारी तसेच संध्याकाळच्या वेळेस कार्यालये सुटल्यावर कोंडी झाली होती.

डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू

प्रत्येक जंक्शनच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी एखादे वाहन नादुरुस्त होऊन बंद पडल्यास ते बाजूला करण्यासाठी क्रेनची तयारी ठेवली आहे.

दरम्यान, अटल सेतूवरील एक लेन सुरू केल्‍याने डागडुजी व डांबरीकरणाच्‍या कामात अडथळे येत आहेत.

या कामासाठी आणलेल्या काही यंत्रांमध्येही वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Unseasonal Rain: गोव्याला अवकाळीचा फटका; 15 दिवसांत पडझडीचे 130 कॉल्स, 34 लाखांचे नुकसान

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Bengaluru Crime: बंगळुरुतील फार्म हाऊसमध्ये सुरु होती ‘रेव्ह पार्टी’; CCB चा छापा, 5 जण गजाआड!

Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

SCROLL FOR NEXT