National Highway: परवानगीविना राष्ट्रीय महामार्गावर रम्बलर्स

निखिल देसाई : ‘आरटीआय’द्वारे माहिती उघड
Rumblers
RumblersDainik Gomantak

National Highway पणजी-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर फोंडा येथे नव्याने डांबरीकरण केल्यानंतर काही ठिकाणी रम्बलर्स घातल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महामार्गावर गतिरोधक किंवा रम्बलर्स घालणे बेकायदेशीर आहे.

परंतु मंगेशी ते फर्मागुढीपर्यंतच्या महामार्गावर नव्याने डांबरीकरण केल्यानंतर त्यावर रम्बलर्स घातल्याने आरटीआय कार्यकर्ते निखिल देसाई यांनी आक्षेप घेतला आहे.

परंतु काही ठिकाणी अपघात घडण्याची दाट शक्यता असते किंवा त्याठिकाणी अपघात घडलेले असतात, अशा ठिकाणावर रम्बलर्स घातले जातात, असे वाहतूक खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

परंतु फोंडा महामार्गावर मंगेशी ते फर्मागुढीपर्यंतच्या अंतरात घालण्यात आलेल्या रम्बलर्सविषयी देसाई यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे रम्बलर्स व गतिरोधक घालण्याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती.

Rumblers
Dr. Pramod Sawant: ...तर राज्याला दोन वर्षे कर्जच घ्यावे लागणार नाही!

रुग्णांना फटका

राष्ट्रीय महामार्गावर रम्बलर्स घातल्याने रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होतो. रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो, अशा तक्रारी आहेत.

महामार्गावर रम्बलर्स घालणे किंवा गतिरोधक घालणे नियमात बसत नाही. पण येथे रम्बलर्स उभारल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com