Panaji Accident Dainik Gomantak
गोवा

Mandovi Bridge Accident: मांडवी पुलाजवळ भीषण अपघात! कारला दुचाकी धडकल्या; दोन्ही चालक गंभीर जखमी

Panaji Accident: पणजीहून पर्वरीकडे जाताना मांडवी पुलाच्या सुरवातीस रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार, महिला आणि पुरुष यांना गंभीर जखम झाली.

Sameer Panditrao

पणजी: पणजीहून पर्वरीकडे जाताना मांडवी पुलाच्या सुरवातीस रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला असून दुचाकीस्वारांना गंभीर मार लागला आहे. उपस्थित नागरिकांच्या तत्परतेमुळे दोघांनाही तत्काळ १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने गोमेकॉ (गोवा वैद्यकीय महाविद्यालय) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातात मार लागलेल्या महिलेचे दात पडले असून ओठांना टाके मारण्यात आले आहे तर मुलाच्या बोटांना गंभीर मार लागल्याने मंगळवारी त्याच्या बोटांना शस्त्रक्रिया करून रॉड घालण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मांडवी पुलावर पर्वरीच्या दिशेने जातानाच चुकीच्या मार्गाने चारचाकी कळविल्याने दोन दुचाकीची वेगनरला आदळल्या. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार, महिला आणि पुरुष यांना गंभीर जखम झाली.

अपघात इतका जोरदार होता की, दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर पडून त्यांच्या अंगाला जखम होऊन रक्त देखील आले. एक दुचाकी पुरुष चालवत होता, तर दुसऱ्या दुचाकीवर महिला चालक होती.

पुरुष दुचाकीस्वाराच्या पायाला आणि विशेषतः हाताच्या बोटांना गंभीर इजा झाली असून त्याच्या बोटांवर शस्त्रक्रियेची गरज भासल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या हाताच्या बोटांना मोठ्या प्रमाणावर मार लागल्याने त्यांच्यावर दोन दिवसात शस्त्रक्रिया करून बोटात ‘रॉड’ बसवावी लागणार आहे.

महिला दुचाकीस्वाराच्या तोंडाला मोठा मार बसला असून, तिचे काही दात देखील पडले आहे. अपघातानंतर तिला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमांवर उपचार आणि दात बसवण्याची प्रक्रिया गोमेकॉत करण्यात येणार आहे.

चालकावर गुन्हा नोंद

अपघाताची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले होते, तर अपघातास कारणीभूत ठरलेला चारचाकी वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून, वाहनचालकाविरुद्ध वाहतूक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT