Chimbel flyover  Dainik Gomantak
गोवा

Chimbel Flyover: चिंबलबाबत नवीन अपडेट! उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच होणार खुला

Panaji Belagavi Highway: पणजी ते बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंबल येथील जंक्शनवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी ते बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील चिंबल येथील जंक्शनवर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी अखेरीस हे काम पूर्ण होऊन फेब्रुवारीमध्ये हा मार्ग वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती येथील अभियंत्यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

चिंबल जंक्शनवरील उड्डाणपुलाचा एक मार्ग गेल्या वर्षी खुला झाल्याने या महामार्गावरील वाहतुकीत सुधारणा झाली आहे. पूल उभारण्यापूर्वी या ठिकाणच्या चौकात उतारामुळे भीषण अपघात घडले होते.

अपघात घडल्यानंतर वारंवार येथील लोक उड्डाणपुलाची मागणी करत होते. अखेर आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केल्यानंतर या पुलाच्या कामाला गती आली आणि एक मार्ग वाहतुकीस खुला झाला. त्यामुळे अपघातांचे प्रमाण घटले आणि वाहतूकही सुविधा सुधारली गेली.

पुलाचा एक मार्ग खुला झाल्यानंतर दुसऱ्या मार्गाचे काम कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु आता या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथील खाडीवर उभारल्या जात असलेल्या उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

"रंगपंचमीलाच रक्ताचा सडा!" प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या बायकोची भररस्त्यात केली हत्या; संतापलेल्या नवऱ्यानं काढला काटा

"ती" बनली काळ! झोपलेल्या नवऱ्याला घरात कोंडलं अन् बाहेरुन टाळं लावून अख्खं घरच दिलं पेटवून; बायकोनं केली संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT