Road Work Canva
गोवा

Panaji Smart City: स्मार्ट सिटीला कामे पूर्ण करायला हवाय अजून वेळ; काँग्रेसने मागितली श्वेतपत्रिका

Smart City Panaji Goa: पणजीतील स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी होत असलेला विलंब यावरुन काँग्रेसने निषेध नोंदवला आहे.

Pramod Yadav

पणजी: राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. सांतिनेज परिसरातील ताडमाड येथील काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळेची मागणी करणारा अर्ज कोर्टाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती देविदास पांगम यांनी दिली आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीची रखडलेली कामे, खर्च झालेला पैसा याबाबत काँग्रेसने श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे.

ताड माड मार्गावरील १२ मीटर मलनिस्सारण सारणीचे काम अपूर्ण आहे. यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता असून, यासाठी वेळेची मागणी करणारा अर्ज कोर्टाकडे करणार असल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. तसेच, ताम माड मार्ग ३१ मे पर्यंत पूर्ण होईल, असेही पांगम याबाबत माहिती देताना म्हणाले.

पणजीतील स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी होत असलेला विलंब यावरुन काँग्रेसने निषेध नोंदवला आहे. अपूर्ण , पूर्ण कामे, झालेला खर्च याबाबत काँग्रेसने श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी कंत्राटदाराला जबाबदार धरुन त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष प्रतिभा बोरकर यांनी केली. स्मार्ट सिटीच्या कामाचे योग्य नियोजन न केल्याप्रकरणी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.

पणजीकरांना खड्डेमय रस्ते, अपूर्ण प्रकल्प, अपूर्ण पायाभूत सुविधा यामुळे शहराचा दुरावस्था झाली आहे. मान्सून जवळ येत असून, रखडलेल्या प्रकल्पामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे, असा आरोप बोरकरांनी केला. काँग्रेसने स्मार्ट सिटी प्रकल्पाची स्वतंत्र तपासणी करुन भ्रष्टाचार उडकीस आणणार असल्याचे म्हटले आहे.

मान्सूनपूर्व स्मार्ट सिटीची रखडलेली कामे पूर्ण न झाल्यास यासाठी जबाबदार असणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करणार असल्याचा इशारा प्रतिभा बोरकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT