Babush Monserrate | Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji police station attack : आठशे लोकांचा जमाव घेऊन बाबूश चालून आले!

सुदेश नाईक यांची साक्ष

दैनिक गोमन्तक डिजिटल

ताळगावचे तत्कालीन आमदार बाबूश मोन्‍सेरात हे 800 लोकांचा जमाव घेऊन पणजी पोलिस स्‍थानकावर चाल करून आले हाेते. त्‍यावेळी त्‍यांचे कार्यकर्ते पोलिसांच्‍या विरोधात घोषणा देत होते. अशा स्‍थितीत बाबूश मोन्‍सेरात यांनी प्रक्षोभक भाषण केल्‍याने जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली.

यावेळी क्षेपणास्‍त्रसदृश वस्‍तूही फेकण्‍यात आल्‍या. त्‍यामुळे तब्‍बल 45 पोलिस जखमी झाले, अशी साक्ष पणजीचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक आणि सध्‍याचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी दिली.

फेब्रुवारी 2008 मध्‍ये झालेल्‍या पणजी पोलिस स्‍थानक हल्‍ला प्रकरणाची सुनावणी सध्‍या दक्षिण गोव्‍याचे प्रधान सत्र न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर सुरू असून नाईक यांची महत्त्वाची साक्ष झाली. याप्रकरणी आणखी काही जणांची साक्ष होणार आहे.

पासपोर्टसाठी मुभा

या प्रकरणातील एक संशयित रुझारिया फर्नांडिस हिने आपल्‍या पासपोर्टचे नूतनीकरण करायचे असल्‍याने पोलिसांनी जप्‍त केलेला पासपोर्ट द्यावा, असा अर्ज केला होता. न्‍या. आगा यांनी त्‍यांची मागणी मान्‍य करताना पोलिसांनी त्‍यांना पासपाेर्ट द्यावा, असा आदेश दिला.

पासपोर्टचे नूतनीकरण झाल्‍यानंतर तो पुन्‍हा पोलिसांकडे जमा करावा, असे या आदेशात म्‍हटले आहे.

माविन गुदिन्हो हाजीर हो!

माजी वीजमंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍या तत्कालीन वीज बिल सवलत घोटाळ्‍याची सुनावणी शुक्रवारी होती. गुदिन्‍हो हा खटला सुरू झाल्‍यापासून एकदाही न्‍यायालयात हजर झालेले नाहीत. त्‍यामुळे 28 रोजी सुनावणीस हजर राहावे, असा आदेश न्यायाधीशांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT