New Traffic Rule : गोयकारांनो जाणून घ्या नवा वाहतूक नियम

आधी जनजागृती, नंतर अंमलबजावणी; एक हजार रुपये दंड : अधीक्षक सिल्वा
 Traffic Rule
Traffic RuleDainik gomantak

राज्यात गेल्या 20 दिवसांत दुचाकीवरील 7 सहचालकांचा अपघाती मृत्यू झाल्याने वाहतूक पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.

मोटार वाहन कायद्यात दुचाकीवरील दोघाही स्वारांना हेल्मेटची सक्ती आहे. त्यामुळे या कायद्याबाबत दुचाकीस्वारांमध्ये काही दिवस जनजागृती करून त्याची अंमलबजावणी 15 दिवसांनंतर करण्याचा विचार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांनी दिली.

 Traffic Rule
Goa Crime News : अज्ञातांची स्‍कूल बसचालकाला मारहाण, विद्यार्थ्यांनी केला आरडाओरडा अन्

हल्लीच झालेल्या अपघातातील सात प्रकरणांमध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्याने तो बचावला, तर मागे बसलेले त्याचे नातेवाईक किंवा मित्र यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता दुचाकीवरील सहचालकालाही हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सुरुवातीला काही दिवस त्याबाबत जनजागृती केली जाईल. दुचाकीस्वारांना त्याचे महत्त्व पटवून दिले जाईल, असे सिल्वा यांनी सांगितले.

काय आहे वाहतूक नियम?

दुचाकी चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या सहचालकानेही हेल्मेट परिधान करणे हे वाहन कायदा 1988 कलम 126 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्यास नवीन वाहन कायद्यानुसार 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित केला जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com