Goa Crime News : चाकूसारखी घातक शस्त्रे, काचेच्या बाटल्या, इतर वस्तूंनी वास्कोत तिघांवर हल्ला

‘गोंयचाे रापणकारांचाे एकवोट’च्या दहा संशयित सदस्यांना अटक
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वेळसाव येथे तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी ‘गोंयचाे रापणकारांचाे एकवोट’च्या दहा सदस्यांना अटक केली. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

मुरगाव तालुका पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 रोजी रात्री दहा वाजता फ्रान्सिस्को ब्रागांझा, अँथनी डिमेलो, केप डिमेलो, ज्योकिम फर्नांडिस, फेलिक्स व्हिन्सेराइट, रेमंड फर्नांडिस, फिलिपो टिओडोसिओ, बाप्टिस्ट डिमेलो, आग्नेलो फर्नांडिस, मेनिनो फर्नांडिस आणि इतर संशयितांनी चाकूसारखी घातक शस्त्रे, काचेच्या बाटल्या आणि इतर वस्तूंनी फिर्यादीच्या नाकावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला.

Crime News
New Traffic Rule : गोयकारांनो जाणून घ्या नवा वाहतूक नियम

परिणामी तक्रारदार गंभीर जखमी झाला. संशयित अँथनी डिमेलो याने फिर्यादीवर चाकूने वार केला, तर केप डिमेलो याने बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी तक्रारदाराचे मित्र क्रिस्टोड रॉड्रिग्स आणि पास्कोल रॉड्रिग्स यांनाही मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

मारहाणीनंतर संशयितांनी तेथून काढता पाय घेतला. तिन्ही जखमींना त्यांच्या मित्रांनी इस्पितळात दाखल केले व वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पहाटे दहा संशयितांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Margao Woman Cheated 33 lakhs
Illegal Arms Smuggling In Goa
online investment fraud arrested
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com