narcotic  Dainik Gomantak
गोवा

Narcotics Raid at panaji: पणजी पोलिसांचा छापा; 3 लाखांचे अमली पदार्थ जप्त, सांतिनेज येथील युवकास अटक

गुप्त माहितीच्या आधारे पणजी पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Police conducted Narcotics Raid : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी काम्पाल येथे कारवाई केली आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचा 3 किलो गांजा (Drugs) जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काम्पाल येथे एक व्यक्ती आपल्या ग्राहकाला अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पणजी पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे काम्पाल येथील होम सायन्स कॉलेज जवळील रस्त्यावर सापळा रचला.

संशयित घटनास्थळी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी संशयिताची तपासणी केली असता त्याच्याकडे 3 लाख रुपये किमतीचा 3 किलो हिरवट रंगाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी संशयितावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. एग्नेलो डायस (31) रा. सांतिनीज असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

SDPO पणजी सुदेश नाईक आणि उत्तर गोव्याचे एसपी निधिन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलिस स्थानकाचे पीआय निखिल पालेकर, एलपीएसआय सपना गावस, पीएसआय संकेत एस. पोखरे, पोलिस कॉन्स्टेबल राजेश रामा लोटलीकर, दीपक सावंत, साहिल तारी आणि उद्धव वडयेकर यांनी ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT