Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हॉटेल रेटिंग करा, पैसे मिळवा! गोव्यातील महिलेला 3 लाखांचा गंडा; संशयिताला राजस्थानमधून अटक

Goa Fraud Case: घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ३ लाख २७ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी राजस्थानमधून संशयित राज्जब हुसैन याला अटक केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ३ लाख २७ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी राजस्थानमधून संशयित राज्जब हुसैन याला अटक केली आहे.

पिडीत महिलेने ५ जून २०२५ रोजी रात्री ७.३५ वाजता पणजी पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी गुप्त माहिती, मोबाईल सर्व्हेलन्स आणि तांत्रिक साधनांच्या साहाय्याने संशयिताचा ठावठिकाणा शोधून काढला आणि राजस्थानमधील जोधपूर येथील ‘किले की घाटी, लैकन मोहल्ला’ येथून संशयिताला अटक केली.

त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोनपावला येथील रहिवासी दीपा शशिकांत योगी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ व ३० मे २०२५ दरम्यान संशयित आरोपीकडून व्हॉट्सअ‍ॅपवरून त्यांच्याशी संपर्क करण्यात आला.

‘हॉटेल रेटिंगचे टास्क पूर्ण करा व घरबसल्या कमाई करा’ असा संदेश त्या व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवण्यात आला. त्यानंतर तिला टेलिग्राम अ‍ॅप डाउनलोड करून एका ग्रुपमध्ये सहभागी होऊन गुंतवणूक करण्यास सांगितले. दीपा यांनी ‘गुगल पे’ व ‘एनईएफटी’च्या माध्यमातून आपल्या एसबीआय बँक खात्यावरून विविध खात्यांमध्ये एकूण ३,२७,३०० रक्कम ट्रान्स्फर केली.

मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार नोंदविली. दरम्यान, गोवा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्याचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री अडचणीत सापडणार? रामा काणकोणकरांच्या आरोपानंतर मारहाण प्रकरणाचा तिढा वाढला

IND vs WI 2nd Test: 12 वर्षांत पहिल्यांदाच! फॉलोऑननंतरही वेस्ट इंडीज संघाने केली कमाल, भारताविरुद्ध रचला धावांचा डोंगर; कॅम्पबेल चमकला VIDEO

Virat Kohli: "त्याने करार नाकारलाय, पण..." क्रिकेटमधल्या दिग्गजानं केलं मोठं विधान; मेगा ऑक्शनपूर्वी 'विराट' सस्पेन्स कायम

India Job Creation: रोजगार निर्मितीचा महाविक्रम! 17 कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती, बेरोजगारी दरात 50 टक्क्यांची ऐतिहासिक घट

Thivim Railway Accident: थिवीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, कोकण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरु; अपघाताचे गूढ कायम?

SCROLL FOR NEXT