Panaji New Mandovi Bridge Closure Dainik Gomantak
गोवा

New Mandovi Bridge: पणजीवासीयांची डोकेदुखी वाढणार! 5 एप्रिलपर्यंत नवा मांडवी पूल राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Panaji New Mandovi Bridge Closure: आता उद्यापासून (27 मार्च) पुन्हा एकदा नवा मांडवी पूल वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

Manish Jadhav

Panaji New Mandovi Bridge Closed March 27 To April 5

पणजी: राजधानी पणजी येथील नव्या मांडवी पूलाची वाहतूक अनेकदा दुरुस्तीसाठी बंद केली जाते. याच पार्श्वभूमीवर आता उद्यापासून (27 मार्च) पुन्हा एकदा नवा मांडवी पूल वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी नवा मांडवी पूल बंद

मिळालेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामासाठी नवा मांडवी पूल (New Mandovi Bridge) 27 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या दहा दिवसांदरम्यान सर्व प्रकारची वाहतूक जुन्या पुलावरुन वळवण्यात येईल. तर 12 टनांहून अधिक वजन असलेली वाहने अटल सेतू मार्गे वळवण्यात येतील.

जुना मांडवी पूल 15 दिवसांसाठी बंद

गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने जुना मांडवी पूल दुरुस्तीच्या कामांमुळे बंद ठेवला होता. सुमारे 15 दिवसांसाठी हा पूल बंद ठेवण्यात आला होता. यामुळे पणजी (Panaji) तसेच पर्वरी भागात वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांचे हाल झाले होते. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवर्समध्ये वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, पणजी शहरात आधीच स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. रस्ते खोदकाम, पाइपलाइन टाकण्याचे काम आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक बदलांमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे.

वाहतूक विभागाचे आवाहन

वाहतूक विभागाने नागरिकांना प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पुलाच्या दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले तरी पुढील आठवडाभर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: अर्थसंकल्‍प चिप्‍स पाकिटासारखा नव्‍हे, चतुर्थीच्‍या माटोळीसारखा! गोविंद गावडेंसह विरोधकांना CM सावंतांचा टोला

Goa Rain Update: गोवेकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' जारी

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

Rashi Bhavishya 24 July 2025: खर्च वाढण्याची शक्यता, आरोग्य सुधारेल; मनातल्या इच्छा पूर्ण होतील

SCROLL FOR NEXT