
Panaji New Mandovi Bridge Traffic Issue
पणजी: म्हापशातून पणजीला येताना गिरी येथे सध्या एकेरी वाहतूक आहे. त्यापुढील मार्गावर वाहतुकीतील गैरसोय रोखल्यास नव्या मांडवी पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी दूर करणे शक्य होणार आहे. सध्या जुना मांडवी पूल बंद आहे.
गिरी येथून पुढे आल्यावर पर्वरीत पुन्हा एकाच दिशेने दोन वाहने जाऊ शकतात. पुढे सेवा रस्त्यावर तीन तीन वाहने जातात. साई सर्व्हिस ते नवा मांडवी पूल या दरम्यान एकाच दिशेने तीन तीन वाहने जातात. पुलावर एकच वाहन एकावेळी जाऊ शकत असल्याने इतर दोन वाहने थांबवावी लागतात.
ती नंतर संधी मिळेल तशी घुसवली जातात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. ती दूर करण्यासाठी न गिरी ते मांडवी पूल दरम्यानच्या वाहतुकीत सुरळीतपणा आणणे गरजेचे आहे. पर्वरी आणि पणजीला जोडणारा जुना मांडवी पूल बंद असल्यामुळे नव्या पुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
दररोज होणारी ही वाहतुकीची प्रचंड कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिक प्रभावी नियोजन करण्याची गरज आहे. वाहतूक व्यवस्थापनात योग्य बदल करून पर्यायी मार्ग तयार करणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुकीत काही प्रमाणात तरी सुसूत्रता येऊन कोंडी कमी होऊ शकते.
गिरी-पर्वरी ते सारस्वत बँक या मार्गावर वाहने ओव्हरटेक करू शकत नाहीत. सारस्वत बँक ते सुकूर जंक्शन येथे ओव्हरटेक करता येते, मात्र पुढे ‘मॉल द गोवा’पर्यंत पुन्हा वाहतूक संथ होते. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.