Waste Management  Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजीवासीयांसाठी अपडेट! ‘सिटीज 2.0’ उपक्रम राबवला जाणार; पायाभूत सुविधा होणार मजबूत

Panaji Smart City: राबविण्यात येत असलेल्या १६ प्रकारच्या कचरा विलगीकरण कामासाठी आता वसाहतस्तरीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत केल्या जाणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शहराच्या विविध भागांमध्ये यापूर्वीच राबविण्यात येत असलेल्या १६ प्रकारच्या कचरा विलगीकरण कामासाठी आता वसाहतस्तरीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत केल्या जाणार आहेत. त्यासाठी पणजी महापालिकेतर्फे ‘सिटीज २.०’ स्मार्ट सिटी आराखड्याशी सुसंगत असलेला हा प्रस्तावित उपक्रम शहरातील निश्चित केलेल्या गृहनिर्माण वसाहतींमध्ये राबविला जाणार आहे, असे आयपीएससीडीएलचे सीईओ संदीप जॅकीस म्हणाले.

उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये!

१. या प्रणालीचे कामकाज दैनंदिन पातळीवर सुरळीतपणे चालण्यासाठी कचरा संकलन, विलगीकरण, साठवणूक आणि विविध प्रकारच्या कचऱ्याची हाताळणी याविषयी हाऊसकीपिंग कर्मचारी, सोसायटी व्यवस्थापन आणि समिती सदस्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम होतील.

२. सोसायटीमधील कचरा तयार होण्याच्या प्रमाणाचा अभ्यास करून त्या त्या वसाहतीसाठी पूरक अशी कचरा विलगीकरण प्रणाली विकसित केली जाईल.

३. कचऱ्याचे वर्गीकरण ओळखण्यासाठी स्पष्ट संकेत फलक आणि पोस्टरही उपलब्ध करून या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल.

४. सोसायटी स्तरावर वेगळा केलेला कचरा थेट गाठी बांधून अधिकृत पुनःप्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेकडे पाठविला जाणार असल्याने मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीवरील (एमआरएफ) भार कमी होईल.

५. सोसायटी स्तरावर विलग केलेला कचरा गोळा केला जाईल. डिजिटल वजनकाट्याचा वापर करून कचऱ्याचे वजन केले जाईल. जेवढ्या पेट्या किंवा पिशव्या उचलल्या जातील, तितक्याच संख्येने रिकाम्या पेट्या किंवा पिशव्या सोसायटीला प्रदान केल्या जातील.

६. पीओएस प्रणालीद्वारे या व्यवहाराची डिजिटल पावती तयार केली जाईल आणि मंजूर दरपत्रकानुसार देयके थेट सोसायटी व्यवस्थापक किंवा समिती प्रतिनिधीला दिली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: स्पेनमध्ये भीषण अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

Crime News: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह पेटीत जाळला, राख नदीत फेकली; हत्येच्या 8 दिवसांनंतर सत्य आलं समोर

Casaulim: ..आणखीन एक खळबळजनक घटना! शेतात आढळली मानवी कवटी; कासावली परिसरात भीतीचे वातावरण

Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

Goa Latest Updates: रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह आढळला

SCROLL FOR NEXT