Panaji Vehicle Theft Case: गुन्हेगारी इतिहास नाही, मग कोठडी कशाला? वाहन चोरी प्रकरणात वकिलांचा जोरदार युक्तिवाद; 19 वर्षीय जेडन-गौरक्षला सशर्त जामीन

Jayden Dsouza & Gauraksh Gawas Bail Granted: वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोन १९ वर्षीय युवकांना मेरशी येथील न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी दिलासा दिला आहे.
Panaji Vehicle Theft Case
Court Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय न्याय संहितेच्या (BNS) नवीन कलमांखाली नोंद झालेल्या एका वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोन १९ वर्षीय युवकांना मेरशी येथील न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी दिलासा दिला आहे. जेडन डिसोझा आणि गौरक्ष गावस या दोघांनाही न्यायालयाने अटी व शर्तींनुसार जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी पणजी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जेडन डिसोझा (१९) आणि गौरक्ष गावस (१९) यांच्या विरोधात पणजी पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याखाली पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन्ही संशयितांनी आपल्या वकिलामार्फत जामिनासाठी मेरशी न्यायालयाचा (Court) दरवाजा ठोठावला होता.

Panaji Vehicle Theft Case
Panaji: पार्किंगमधील सरकारी वाहनात आढळला मृतदेह, पणजीतील घटनेने खळबळ; ‘संशयास्पद मृत्यू’ म्हणून गुन्हा नोंद

संशयितांच्या वकिलांचा युक्तिवाद

जामिन अर्जावर सुनावणी सुरू असताना संशयितांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. "दोन्ही संशयित अवघ्या १९ वर्षांचे असून त्यांचे करिअर सुरू आहे. त्यांचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही आणि ते निर्दोष आहेत. तपासासाठी आता त्यांची अधिक कोठडीत गरज नसून, ते समाजात स्थिर आहेत. न्यायालय तपासात सहकार्य करण्यासाठी आणि पुराव्यांशी छेडछाड न करण्यासाठी घालण्यात येणाऱ्या सर्व अटींचे पालन करण्यास तयार आहेत," असे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

पोलिसांचा जामिनाला विरोध

दुसरीकडे, तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाने या जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, २४ डिसेंबर २०२५ रोजी संशयितांच्या भावांनी गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने स्वतःहून पोलीस ठाण्यात आणून जमा केली आहेत. चोरीची मालमत्ता हस्तगत झाल्यामुळे संशयितांविरुद्धचा गुन्हा प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. जर या युवकांना जामीन मिळाला, तर ते पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करू शकतात, पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतात किंवा कायद्याच्या प्रक्रियेतून फरार होऊ शकतात, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली.

Panaji Vehicle Theft Case
Panaji Air Quality: धोक्याची घंटा! राजधानीची हवा झाली 'असुरक्षित'; नोव्हेंबर महिन्यात पणजीचा AQI 176 वर

न्यायालयाचा आदेश

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, मेरशी येथील न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी संशयितांचे वय आणि त्यांचा कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा विचार केला. तपासात प्रगती झाली असून चोरीची वाहने हस्तगत झाल्यामुळे त्यांना अधिक काळ कोठडीत ठेवणे आवश्यक नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यानुसार, जेडन आणि गौरक्ष यांना वैयक्तिक मुचलक्यावर आणि पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे दोन्ही युवकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी पणजी (Panaji) पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून भविष्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com