Panaji Election  Dainik Gomantak
गोवा

Panaji Election: पणजीत प्रभाग फेररचना मसुदा पडताळणी सुरू! 6 दिवस राहणार खुला; 5 वर्षांत केवळ 445 मतदार वाढले

Panaji Municipal Election: येत्या मार्च महिन्यात होऊ घातलेल्या पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी नगर नियोजन खात्याने प्रभाग फेररचना मसुदा मंगळवारी जाहीर केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: येत्या मार्च महिन्यात होऊ घातलेल्या पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी नगर नियोजन खात्याने प्रभाग फेररचना मसुदा मंगळवारी जाहीर केला होता. तो मसुदा नागरिकांना पाहण्यासाठी महानगरपालिका आणि तिसवाडी मामलेदार कार्यालयात उपलब्ध करून दिला असून लोक सध्या हा मसुदा येऊन आपले घरक्रमांक, मतदारयादीतील नाव त्याच प्रभागात आहे काय, याची खातरजमा करू लागले आहेत.

नगर विकास खात्याने ३० प्रभागांचा फेररचना मसुदा जाहीर करताना नागरिक तथा मतदारांकडून २९ जानेवारीपर्यंत आक्षेप, सूचना आणि दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार आहेत. सुटीच्या दिवशी हा मसुदा पाहता येणार नाही. त्यामुळे उद्याचा शुक्रवार सोडल्यास शनिवार, रविवार आणि सोमवारी (२६) असे तीन तो मसुदा पाहता येणार नाही.

त्यानंतरचे मंगळवार ते गुरुवार अशा तीन दिवस म्हणजेच केवळ सहा दिवस लोकांना तो मसुदा पाहता येणार आहे. मसुदा उपलब्ध झाल्याने मतदारसंघ फेररचना होणार असल्याचे स्पष्ट होते. मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची महानगरपालिकेच सत्ता आहे. मागील निवडणुकीतही त्यांना अपेक्षीत अशीच प्रभाग फेररचना झाली होती, आताही तशीच होईल हे स्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासाठी सुरक्षित प्रभाग निवडला आहे. माजी महापौर तथा महिला नगरसेवक कॅरिलीना पो यांचा प्रभाग रोहितसाठी दिला जाणार असल्याचे चर्चिले जात आहे. त्याशिवाय काही नगरसेवकांचा पत्ताही यात कापला जाण्याची शक्यता आहे.

३२,४९६ मतदार

पणजी महानगरपालिकेत ताळगावातील काही भाग जोडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे प्रभाग संख्या निश्चितीकरण झाले आहे. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत महानगरपालिकेसाठी एकूण मतदारसंख्या ३२ हजार ५१ होती, त्यात थोडीशी वाढ होऊन ती संख्या सध्या ३२ हजार ४९६ वर पोहोचली आहे. यावरून महानगरपालिकेसाठी केवळ ४४५ मतदार वाढल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT