Panaji Election | Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panaji Municipal Elelction: पणजी निवडणूकीसाठी 'बाबूश' यांचे उमेदवार जाहीर! 7 नव्या चेहऱ्यांना संधी; विरोधी गटाच्या यादीची उत्सुकता

Babush Monserrate: पणजी महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नेतृत्वाखालील ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ या पॅनलचे ३० उमेदवार निश्‍चित झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नेतृत्वाखालील ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ या पॅनलचे ३० उमेदवार निश्‍चित झाले आहेत. या यादीवर भाजपने शिक्कामोर्तब केले असले, तरी ती अधिकृतरित्या जाहीर होणे बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी पॅनलतर्फे ३० पैकी १४ प्रभागांत बदल केले असले तरी त्याठिकाणी ७ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

पणजी महापालिका निवडणुकीसाठी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नेतृत्वाखालील ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ या पॅनलचे ३० उमेदवार निश्‍चित करण्यात आले आहेत. तर विरोधी गटातील उत्पल पर्रीकर, दत्तप्रसाद नाईक यांच्या पॅनलचे उमेदवार केव्हा जाहीर होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाबूश मोन्सेरात महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी सरसावले आहेत. त्यांनी यापूर्वी प्रसारमाध्यमांना ३० पैकी ३० जागा निवडून आणणार असल्याचे सांगितले आहे. ५० टक्के नवे चेहरे असतील, असे त्यांनी जाहीर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यात सातच नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले. ज्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली, त्यात मार्गारिडा फर्नांडिस, कबीर पिंटो माखिजा, मिलिंद शिरोडकर, किशोर शास्त्री आणि रूपेश हळर्णकर यांचा समावेश असल्याचे कळते.

रिंगणातील नव्या चेहऱ्यांचा विचार केला तर पणजी भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष संजीव देसाई यांना उमेदवारीची बक्षिसी मिळाली आहे. भाजप सदस्य नोंदणी करण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावल्याने त्यांना प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी दिल्याचे सांगितले जाते. शिवाय प्रभाग १ मध्ये महिला राखीव असल्याने युतिका जांबावलीकर यांना उमेदवारी दिली आहे.

याशिवाय करिना शिरोडकर, प्रज्योत वायंगणकर, तुकाराम चिनानवार, विद्या गडकर, ज्योती मोरजकर आणि कीर्ती शिरोडकर यांचा समावेश आहे. उर्वरित १७ विद्यमान नगरसेवकांमध्ये रोहित मोन्सेरात, कॅरोलिना पो, बेंटो लॉरेन, प्रसाद आमोणकर, वर्षा शेट्ये, उदय मडकईकर, शायनी चोपडेकर, अस्मिता केरकर, डेनिस एडवर्ड जॉर्ज, शुभम चोपडेकर, मनीषा मणेरकर, दीक्षा माईणकर, करण पारेख, वसंत आगशीकर, विठ्ठल चोपडेकर, सँड्रा डिकुन्हा आणि सिल्वेस्टर फर्नांडिस यांचा समावेश आहे.

प्रभागनिहाय उमेदवारांची यादी

प्रभाग उमेदवारांचे नाव

१ युतिका जांबावलीकर

२ कॅरोलिना पो

३ मार्गारिडा फर्नांडिस

४ रोहित मोन्सेरात

५ किशोर शास्त्री

६ बेंटो लॉरेन

७ संजीव देसाई

८ करिना शिरोडकर

९ कबीर पिंटो माखिजा

१० प्रसाद आमोणकर

११ तुकाराम चिनानवर

१२ वर्षा शेट्ये

१३ उदय मडकईकर

१४ प्रज्योत वायंगणकर

१५ शायनी चोपडेकर

१६ अस्मिता केरकर

१७ डेनिस एडवर्ड जॉर्ज

१८ मिलिंद शिरोडकर

१९ ज्योती मोरजकर

२० शुभम चोपडेकर

२१ मनीषा मणेरकर

२२ दीक्षा माईणकर

२३ विद्या गडकर

२४ करण पारेख

२५ कीर्ती साखळकर

२६ वसंत आगशीकर

२७ विठ्ठल चोपडेकर

२८ रूपेश हळर्णकर

२९ सँड्रा दा कुन्हा

३० सिल्वेस्टर फर्नांडिस

‘आमचे उमेदवार योग्यवेळी जाहीर करू’

आम्ही आमच्या पॅनलचे उमेदवार योग्यवेळी जाहीर करू. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. पणजीच्या आमदारांनी ५० टक्के नवे चेहरे देणार, असे सांगितले होते; पण त्यांनी निवडलेल्या उमेदवारांमध्ये किती नवे चेहरे आहेत, हे पाहिल्यानंतर कळते. अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT