Fish market issues in Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji Fish Market: कोट्यवधीचा खर्च पण पाणी तुंबलेलेच, पणजी न्यू फिश मार्केटची व्यथा; मासेविक्रेते नाराज

Panaji New Fish Market Drainage Issue: मिळालेल्या माहितीनुसार शेडमधील फरशी बसविण्याचे काम पूर्ण झाल्या-झाल्या त्यांनी महानगरपालिकेच्या मार्केट समिती चेअरमन बेंटो लॉरेन यांनी कळविले.

Sameer Panditrao

Fish market issues in Panaji

पणजी: मासळी विक्रेत्यांच्या सोयीसाठी महापालिकेच्यावतीने नव्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या शेडमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याची समस्या सुरुवातीलाच दिसून आली आहे. ज्यापद्धतीने पाण्याचा निचरा व्हावा यासाठी विशिष्ट पद्धतीची फरशी आणि त्या फरशीला काही अंशी उतार देणे आवश्यक होते, पण तसे काहीच झालेले नाही.

धेंपो हाऊसशेजातील पार्किंगच्या जागेतून मासळी विक्रेत्यांचे काल स्थलांतर केले आहे. मात्र, या शेडमध्ये मासळीचे पाणी किंवा मार्केट धुतल्यानंतर पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे. सपाट पद्धतीने बसविण्यात आलेल्या ग्रे लाईमस्टोन टाईल्स बसविण्यात आल्या असून, त्या फरशीला ओबडधोबडपणा आहे.

पाण्याचा निचरा होतोय की नाही, हे कंत्राटदाराने पाहिलेच नाही, असेच यावरून दिसते. मिळालेल्या माहितीनुसार शेडमधील फरशी बसविण्याचे काम पूर्ण झाल्या-झाल्या त्यांनी महानगरपालिकेच्या मार्केट समिती चेअरमन बेंटो लॉरेन यांनी कळविले.

त्यांनी आयुक्तांची परवानगी घेऊन शनिवारी मार्केटमध्ये विक्रेत्यांचे स्थलांतर केले, खरे पण मासळी विक्रेते बसतात त्या ठिकाणीही आजूबाजूला पाणी साचत आहे.

फरशीवरून पाण्याचा निचरा होत नाही, कारण विक्रेत्यांची बसण्याची व्यवस्था पूर्व-पश्चिम अशी आहे, तर निचऱ्याची सुविधा दक्षिण-उत्तर आहे. त्यामुळे विक्रेत्यांच्या उजव्या-डाव्या बाजूला चढ-उतार हवे होते, तशी काळजी कंत्राटदाराने घेतलेली दिसत नाही.

मासळी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचे काम तत्काळ करायचे होते, त्यासाठी निर्णय घेण्यात आला. पाणी निचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बसविण्यात आलेल्या फरशीवर मशिन फिरवून उतार दिला जाईल. उद्या, सोमवारी या शेडची पाणी करून काय-काय उणीवा राहिल्यात त्या पाहिल्या जातील आणि त्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून ते काम करून घेतले जाईल.
बेंटो लॉरेन, चेअरमन, मार्केट समिती महानगरपालिका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT