Panaji Election Dainik Gomantak
गोवा

Panaji Election: पणजी महापालिकेचा बिगूल! 11 मार्चला मतदान, 13 रोजी मतमोजणी; कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा..

Panaji Municipal Corporation election: : पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. या कार्यक्रमानुसार मार्च महिन्यात ११ रोजी मतदान आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये १३ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे पणजी महानगरपालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू झाली असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त मेनिनो डिसोझा सांगितले. दरम्यान, मंगळवारपासून (ता.१७) अर्ज सादरीकरणास सुरुवात होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेस सचिव वेनान्सियो फुर्तादो आणि राज्य निवडणूक आयोगाचे साहाय्यक संचालक सागर गुरव उपस्थित होते. डिसोझा म्हणाले, महानगरपालिकेची मागील पंचवार्षिक निवडणूक २० मार्च २०२१ रोजी झाले होते, त्यानंतर महानगरपालिकेची बैठक ३० मार्च २०२१ रोजी झाल्याने विद्यमान मंडळाचा कार्यकाल २९ मार्च २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे.

परंतु, संविधानानुसार नियम २४३ झेडए नुसार पणजी महानगरपालिका कायदा २०२ च्या अधिनियम ११ नुसार ही निवडणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. डिसोझा म्हणाले, या महिन्यात २ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेच्या प्रभागरचनेची अधिसूचना काढण्यात आली. त्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या जाहीर करण्यात आल्या.

या निवडणुकीत महानगरपालिकेसाठी ३० प्रभागांमध्ये महिला वर्गासाठी १०, ओबीसी वर्गासाठी ८ आणि एसटी वर्गासाठी १ जागा आरक्षित ठेवली गेली आहे. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हे नगरपालिकांचे निवडणूक अधिकारी असतील. उपजिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी आणि मामलेदार तिसवाडी हे साहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम करतील. आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी निरीक्षक, खर्च निरीक्षक आणि भरारी पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

उमेदवार अर्ज सादर करण्याची तारीख: १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी (सकाळी १० ते

दुपारी १)

उमेदवार अर्जांची छाननी : २५ फेब्रुवारी

अर्ज माघार घेण्याची वेळ : २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

उमेदवारांची अंतिम यादी जाहीर : २६ फेब्रुवारी दुपारी ३ नंतर.

मतदान प्रक्रिया : ११ मार्च (सकाळी ८ ते ५)

मतमोजणी : १३ मार्च (सकाळी ८ वाजल्यापासून सुरू)

ठळक बाबी...

१ ३० प्रभागांत ४८ मतदान केंद्रांचा समावेश.

२ प्रत्येक उमेदवारांना खर्चाची मर्यादा ही अडीच लाख रुपये. उमेदवाराच्या अर्जाकरिता खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी २ हजार आणि राखीव वर्गातील उमेदवारांकडून एक हजार रुपये शुल्क आकारले जातील.

३ बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया होणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT