Panaji Municipal Election: पणजी महापालिकेसाठी विरोधक येणार एकत्र? पर्रीकर, नाईकांची तयारी; एकास एक उमेदवार देण्याची व्यूहरचना

Panaji Elelction Updates: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ या गटाचे उमेदवार निश्चित झाले असून, त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
Panaji Election
Panaji ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयोग फसल्यानंतर आता पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तसा प्रयोग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पणजी महापालिकेवरील पकडीला आव्हान देण्यासाठी उत्पल पर्रीकर आणि दत्तप्रसाद नाईक पुढे सरसावले असून, त्यांना इतर विरोधी पक्ष, नेत्यांनी पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ या गटाचे उमेदवार निश्चित झाले असून, त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. मोन्सेरात यांनी या निवडणुकीत ३० पैकी ३० जागा निवडून येणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांमुळे पणजीकरांनी जो त्रास सहन केला, त्याशिवाय मोन्सेरात यांनी मागील जाहीरनाम्यानुसार किती कामांची पूर्तता केली, या सर्व बाबींचा या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे म्हणून वापर केला जाणार आहे.

उत्पल पर्रीकर आणि दत्तप्रसाद नाईक यांनी ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीला सांगितले, की आमची निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून, आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर उमेदवार जाहीर करून आघाडीची भूमिका मांडली जाईल.

विरोधकांनी आपले पत्ते पूर्णतः खुले न केल्याने सत्ताधारी गटाला पुढील आडाखे बांधणे कठीण झाले आहे. सत्ताधारी गटाचे संभाव्य उमेदवार कोण असणार आहेत, हे ‘गोमन्तक’ने शनिवारच्या अंकात जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून आता एकास एक उमेदवार देण्याची चाचपणी सुरू झाली

‘एसआयआर’ यादीनुसार निवडणूक घ्याव्यात!

मळा येथील उदय च्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही निवडणूक ‘एसआयआर’ यादीनुसार घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रभागांची पुनर्रचना केली आहे, ती मनमानी आणि बेकायदेशीर आहे. सीसीपी कायदा २००२ चे ते उल्लंघन आहे. राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदार यादीनुसार निवडणूक घेणे आवश्‍यक होते.

सुरेंद्र फुर्तादो, मिनीन डिक्रूझ उत्पलसोबत?

बाबूश यांचे विरोधक उत्पल पर्रीकर आणि दत्तप्रसाद नाईक यांनी यावेळी एकास एक उमेदवार देण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. शिवाय काँग्रेसचे सुरेंद्र फुर्तादो आणि मिनीन डिक्रुझ हेही पर्रीकरांना साथ देतील, असे चित्र आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांची भूमिका काहीही राहिली तरी पणजीत काँग्रेसकडे खंबीर नेतृत्व नाही. त्यामुळे मतदारांच्या हातीच जो तो निर्णय राहणार आहे.

Panaji Election
Panaji Municipal Elelction: पणजी निवडणूकीसाठी 'बाबूश' यांचे उमेदवार जाहीर! 7 नव्या चेहऱ्यांना संधी; विरोधी गटाच्या यादीची उत्सुकता

गतनिवडणुकीतून घेतला धडा

गतनिवडणुकीत विरोधी गट करण्याचा प्रयत्न फसला होता. त्यामुळे काही उमेदवारांचा प्रचार विरोधी नेत्यांना करावा लागला होता. प्रबळ विरोधी गट न झाल्याने त्याचा फायदा मोन्सेरात गटाला झाला आणि त्यांचे तब्बल २५ उमेदवार निवडून आले होते. हा अनुभव लक्षात घेऊन विरोधकांनी एकसंघता दर्शविली अाहे.

Panaji Election
Panaji Election: पणजी मनपा निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर! अनेक दिग्गजांची अडचण; प्रभागाची शोधाशोध सुरु

निवडणूक आचारसंहिता उद्यापासून?

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून सोमवार, १६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून आचारसंहिता लागू करण्याची घोषणा करू शकते. यावेळी आयोगाकडून महापालिका निवडणुकीची तारीख, मतमोजणी तारीख जाहीर होईल, तसेच इतर निवडणूक कार्यक्रम कसा असेल, याची माहिती देण्यात येईल. मार्च महिन्यात सत्ताधारी पक्षाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com