Panaji market problems Dainik Gomantak
गोवा

Panaji Market: पणजी मार्केटमध्ये सावळागोंधळ! विक्रेत्यांच्या साहित्यामुळे रस्ताच बंद, स्वच्छतेचे तीनतेरा; सुपरवायझरचेही दुर्लक्ष

Panaji market problems: मार्केटचे चेअरमन बेंटो लॉरीन यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, वारंवार सांगूनही विक्रेते ऐकत नाहीत. आता साहित्य जप्त केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

Sameer Panditrao

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या मार्केटमध्ये सध्या बेशिस्त दिसून येत आहे. सोपो विक्रेते असो की दुकानदार सर्वच व्यापारी रस्त्याच्‍या मध्यभागापर्यंत आपले साहित्य विक्रीसाठी आणून ठेवून रस्ता अडवीत आहेत. मार्केटमध्ये शिस्त आणण्याचे काम ज्या कामगारांकडे सोपविण्यात आले आहे, त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कोणीही कसेही साहित्य ठेवत असल्यामुळे मार्केटची रयाच गेल्यासारखे दिसत आहे.

मार्केटचे चेअरमन बेंटो लॉरीन यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, वारंवार सांगूनही विक्रेते ऐकत नाहीत. आता साहित्य जप्त केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. याविषयी महापौर आणि आयुक्तांना मार्केटमधील विक्रेत्यांची बेशिस्तीची बाब सांगितली जाईल आणि मगच कारवाईचे पाऊल उचलले जाईल.

विक्रेत्यांना शिस्त लावण्याचे काम खरे तर येथील मार्केट सुपरवायझरचे आहे आणि त्याचा धाकही तेवढा असणे गरजेचे आहे. मार्केट सुपरवायझरचा काहीच धाक दिसत नसल्याने विक्रेते सर्रासपणे मनमानी करताना दिसत आहेत.

सुपरवायझरचे शिस्तीवर आणि स्वच्छतेवर लक्ष असणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या सुपरवायझरनी काय दिवे लावले होते, हे सर्वज्ञात आहे, परंतु सध्याच्या सुपरवायझरनी आक्रमक भूमिका घेणे आवश्यक आहे. पणजी मार्केट हे शहराचा आरसा दाखवणारे असते, पण तेच जर असे बेशिस्तपणा दाखवित असेल, तर पर्यटकांत काय संदेश जायचा तो जात आहे.

चेअरमनांच्या कृतीकडे लक्ष

भाजीपाला विक्रेते असो की दुकानदार असोत आपला सोपो, दुकान सोडून रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत दुकानाचे साहित्य विक्रीसाठी ठेवत आहेत. रस्त्यात साहित्य का ठेवले म्हणून विचारणा केली तर पात्रांवास विचारा असे कामगार सांगतात. महापौर व उपमहापौर दोन दिवसांनी निवडले जाणार आहेत. त्यावेळी इतर समित्याही निवडल्या जातील. तत्पूर्वी मार्केटमध्ये शिस्त आणि स्वच्छता राखण्यावर सध्याचे चेअरमन काय पावले उचलतात हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT