Panaji Market: रस्त्यांचे खोदकाम, सततची वाहतूक कोंडी, पोलिसांचे दुर्लक्ष! 'स्मार्ट' समस्यांचा विळखा कधी संपणार?

Panaji Market Traffic Issue: वाहतूक कोंडीचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा ठिकाणी खरेतर वाहतूक पोलिसाची गरज असतानाही तेथे पोलिस नेमले जात नाहीत.
Panaji Market Traffic Issue
Panaji Smart City Work Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Traffic Jam Problem

पणजी: पणजी मार्केट परिसरात श्रीकृष्ण काजू दुकानासमोरील चौकात पूर्व आणि उत्तरेकडील रस्त्याचे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत काम सुरू आहे. त्याचबरोबर उर्वरित रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा ठिकाणी खरेतर वाहतूक पोलिसाची गरज असतानाही तेथे पोलिस नेमले जात नाहीत.

मार्केट परिसरातील श्रीकृष्ण काजू दुकानासमोरील चौकातून धेंपे हाऊसकडे आणि गीता बेकरीकडे जाणाऱ्या मार्गाचे स्मार्ट रस्ता करण्याचे काम सुरू आहे. दोन्ही रस्त्यांचे खोदकाम केल्याने चौकात वाहतूक बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे मार्केटकडून येणाऱ्या वाहनांना दक्षिणेकडे वळावे लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने चौकातच वाहने उभी करून अकजण बाजारात जातात. त्यामुळे मार्केटकडून येणारी चारचाकी वाहने किंवा मोठी वाहने वळविताना अडकून पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार सतत घडत आहेत.

Panaji Market Traffic Issue
Panaji: जूनअखेरीस पणजी होणार 'स्मार्ट'! खंडपीठाने दिली मुदतवाढीला मान्यता; ‘इमॅजिन’ची हमी

त्याशिवाय मार्केटसमोरील डॉन बॉस्कोकडे जाणाऱ्या मार्गाचा ये-जा करिता वापर होत आल्याने या रस्त्यावर आता ताण आला आहे. कारण आयनॉक्सच्या मागील मार्केटकडे येणाऱ्या रस्त्याचेही स्मार्ट मार्ग करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने तो रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे मार्केटकडून बांदोडकर मार्गावर जायचे झाल्यास अनेकांना विविध मार्गांचा वापर करावा लागत आहे.

Panaji Market Traffic Issue
Bhatlem: भाटलेतील खोदकामामुळे नागरिक त्रस्त! विद्यार्थ्यांची ससेहोलपट; पणजी, ताळगावात येताना होतेय कसरत

भाटलेतील कामाला गती!

भाटलेतील गटाराचे व मलनिस्सारण चेंबरचे काम सध्या गतीने सुरू आहे. उद्या, ता. २३ पर्यंत फोन्ताईन्हास ते तांबडीमाती हा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. त्यामुळे इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) तीन दिवस रस्ता बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते, त्यानुसार उद्याच्या (रविवार) दिवसांत हे काम काम कंत्राटदाराला पूर्ण करावे लागणार आहे. शनिवारीही मळा-बसस्थानकाकडे व ताळगाव, तांबडीमातीकडे घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना आपली वाहने आल्तिनोमार्गे वळवून नेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com