Panaji Market Dainik Gomantak
गोवा

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

Panaji Market Safety Action: वास्को मार्केटमधील दुकानगाळ्यांना लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पणजी मार्केटमधील अग्निशामक यंत्रणा कुचकामी झाल्याच्या आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर ‘गोमन्तक’ने शुक्रवारी प्रकाश टाकला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: वास्को मार्केटमधील दुकानगाळ्यांना लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पणजी मार्केटमधील अग्निशामक यंत्रणा कुचकामी झाल्याच्या आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर ‘गोमन्तक’ने शुक्रवारी प्रकाश टाकला. त्याची दखल घेत शनिवारी महानगरपालिका समिती चेअरमन कॅरोलिना पो यांनी अधिकाऱ्यांसमवेत जाऊन मार्केटमधील चहा-खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला टाळे ठोकले.

वास्कोतील आगीच्या दुर्घटनेत सुमारे १५० दुकानांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री ही आगीची घटना घडली होती. त्यावेळी मार्केट परिसरात असलेल्या अग्निशामक सुविधेवर आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. पणजी मार्केटमधील अग्निशामक सुविधाही अशीच कुचकामी आहे, अग्निशामक दलाने ती बदलण्यास सांगूनही महानगरपालिकेने ते काम केलेले नाही. त्यामुळे आगीची घटना घडली तर मार्केटमधील दुकानांची हानी होऊ शकते, याकडे ‘गोमन्तक’ने लक्ष वेधले होते.

विशेष बाब म्हणजे महानगरपालिकेला सुट्टी असतानाही निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना घेऊन चेअरमन कॅरोलिना यांनी मार्केटमध्ये शनिवारी सकाळी धडक दिली. त्यांनी पहिल्या मजल्यावर दुकानगाळ्यात विजेच्या यंत्रावर चहा व खाद्यपदार्थ करीत असलेल्या गाळेमालकावर कारवाईचा बडगा उगारला आणि गाळ्याला टाळे लावण्यास सांगितले.

याशिवाय दुकानांच्या बाहेर ठेवलेले साहित्यही उचलण्यास सांगितले. दुकानगाळ्याच्या बाहेर एक-दीड फूट लाकडी कपाट अथवा टेबल ठेवून साहित्य ठेवणाऱ्यांवरही महानगरपालिकेने कारवाई केली. काही दुकानदारांचे साहित्य यावेळी ताब्यात घेतले असून, दंडाची रक्कम भरून ते त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महानगरपालिका मार्केट समितीच्या चेअरमन कॅरोलिना यांच्यासमवेत महानगरपालिका निरीक्षक महाले, त्याशिवाय समितीच्या सदस्य असलेल्या महिला नगरसेवक अस्मिता केरकर व इतरांची उपस्थिती होती.

अस्वच्छतेवर करणार कारवाई

महानगरपालिका मार्केटमधील गाळ्यांमध्ये खाद्यपदार्थ तयार करून विक्री करीत असल्याची तक्रार आली होती. वास्कोतील घटनेमुळे आलेल्या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्षात काय घडत आहे, याची पाहणी केली. संबंधित गाळेचालकावर कारवाई केली असून, त्या गाळ्याला टाळे ठोकले आहे. याशिवाय येथील विक्रेत्यांकडून स्वच्छता राखली जात नसल्याच्याही तक्रारी आल्या असून, त्याबाबत कचरा व ज्या गाळ्यासमोर अथवा शेजारी थुंकले जात आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे चेअरमन कॅरोलिना पो यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

Right to Vote: मताधिकार केवळ मतदानापुरता नाही! 300 वर्षांपूर्वीच्या निकालाची आजच्या 'एसआयआर'शी सांगड

Weekly Horoscope: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नशीब चमकणार! सिंह-धनु राशींना नोकरीत प्रगतीचे संकेत, तर कन्यासह 3 राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Goa Politics: काँग्रेसचा आदर्शवाद, भाजपची वास्तववादी रणनीती; गोव्याच्या राजकारणात नवी लढाई

SCROLL FOR NEXT