Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji: महापालिकेचा माणुसकीचा हात! बेघर आणि भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केली विशेष हेल्पलाईन

Panaji Homeless Helpline: शहर अधिक सुरक्षित आणि संवेदनशील बनवण्याच्या दृष्टीने पणजी महानगरपालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: शहर अधिक सुरक्षित आणि संवेदनशील बनवण्याच्या दृष्टीने पणजी महानगरपालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील बेघर, अत्यंत निराधार आणि भिकारी व्यक्तींना तत्काळ मदत व हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी महापालिकेने विशेष हेल्पलाईन कार्यान्वित करत माणुसकीचा हात पुढे केला आहे.

पणजीतील नागरिक आता अशा व्यक्तींची माहिती देण्यासाठी +९१ ९४०३६८७४६० या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवू शकतात. माहिती मिळताच, पणजी महानगरपालिकेचे नियुक्त प्रतिसाद पथक, ‘अल शदाई चॅरिटेबल ट्रस्ट’चे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी पोहोचतील.

हे पथक बेघर, निराधार आणि भिकारी व्यक्तींची सुटका करून त्यांचे योग्य संगोपन, पुनर्वसन किंवा त्यांना निवारा गृहांमध्ये नेण्याची व्यवस्था करेल. पणजी महानगरपालिका आणि ‘अल शदाई चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.

अल्पवयीन मुलांसाठी ‘१०९८’ क्रमांक

या प्रकरणांमध्ये जर अल्पवयीन मुले असतील, तर जनतेने ‘१०९८’ या ‘चाइल्ड हेल्पलाईन’वर संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे. या मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर केले जाईल आणि विहित बाल संरक्षण प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाईल.

नागरिकांनी पाठिंबा द्यावा!

पणजी महानगरपालिकेने सर्व रहिवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी मदतीची गरज असलेल्या बेघर, निराधार किंवा भिकारी व्यक्तींची माहिती देऊन या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा द्यावा. जनतेकडून वेळेत मिळालेली माहिती गरजू व्यक्तींना लवकरात लवकर निवारा, काळजी आणि पुनर्वसन मिळवून देण्यास मदत करेल. महानगरपालिकेने निर्देश दिले आहेत की, या उपक्रमांतर्गत सुटका आणि पुनर्वसनाचे सर्व प्रयत्न प्रत्येक व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर आणि सन्मान राखून केले जावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT