Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: अमली पदार्थांसह अटक केलेल्या 'अटाला'ला कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

Israeli Drug Dealer Atala: अमली पदार्थांसह अटक केलेल्या यानिव बेनायम ऊर्फ अटाला या इस्त्रायली नागरिकाचा जामीन अर्ज उत्तर गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अमली पदार्थांसह अटक केलेल्या यानिव बेनायम ऊर्फ अटाला या इस्त्रायली नागरिकाचा जामीन अर्ज उत्तर गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने त्याला पकडले आहे.

न्यायालयात सरकार पक्षाने जामिनास तीव्र विरोध दर्शविताना अटालाची गुन्हेगारी पार्श्वभूमी अधोरेखित केली. त्याच्यावर एकूण सात गुन्हे दाखल असून त्यापैकी चार प्रकरणांत त्याला दोषी ठरविण्यात आले आहे, तर उर्वरित तीन प्रकरणे तपासाधीन आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटालाने यापूर्वी भारताबाहेर पलायन करण्याचे दोन प्रयत्न केले होते. पहिल्यांदा त्याने नेपाळमार्गे यशस्वी पलायन केले होते आणि नंतर त्याला पेरू येथून भारतात परत आणण्यात आले होते. तसेच त्याच्याकडे वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्यामुळे तो भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास आहे, हेही नोंदवण्यात आले.

तपासासाठी आरोपीची पुन्हा पोलिस कोठडीत गरज असल्याचे नमूद करून, त्याला मुक्त केल्यास तो परत पलायन करू शकतो आणि शोधण्यात अडचणी येऊ शकतात, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik’s Asthi Visarjan: खांडेपार नदीत दिवंगत रवी नाईक यांच्या अस्थींचे विसर्जन

Goa Mining: खूषखबर! राज्य खाण तयारी निर्देशांकात गोवा अव्वल; उद्योगवाढीची केंद्राला अपेक्षा

Donald Trump Oil Claim: 'भारत रशियाकडून तेलाची खरेदी थांबवणार'! ट्रम्प यांच्या नवा दाव्यामुळे चर्चेला उधाण

वाळूमाफियांना बसणार चाप! जनतेसाठी हेल्पलाईन जाहीर; तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक जाणून घ्या..

Horoscope: बुधादित्य योग! 'या' राशींना होणार मोठा फायदा; धन प्राप्तीसाठी उत्तम वेळ

SCROLL FOR NEXT