Goa News: शिरगाव श्री लईराई देवीच्या जत्रेला यंदाही 'गोबी मंच्यूरियन'चे स्टॉल घालण्यास बंदी

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी.
Marathi breaking news
Marathi breaking newsDainik Gomantak
Published on
Updated on

शिरगाव श्री लईराई देवीच्या जत्रेला यंदाही 'गोबी मंच्यूरियन'चे स्टॉल घालण्यास बंदी

शिरगाव श्री लईराई देवीच्या जत्रेला यंदाही 'गोबी मंच्यूरियन'चे स्टॉल घालण्यास बंदी. देवस्थान समितीकडून 'एफडीए'ला निवेदन. स्टॉल आढळल्यास कडक कारवाईचा इशारा.

नेरुळ जवळील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या सुक्या गवताला आग

फत्तावाडो, नेरुळ जवळील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या वेरे येथे सुक्या गवताला आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग जवळच्या शेतात वेगाने पसरली, त्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित मदत केली आणि ती आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले.

काजू फेस्टीवलच्या नव्या तारखा जाहीर

17 आणि 18 मे रोजी पणजीत बांदोडकर मैदानावर संपन्न होणार काजू महोत्सव.

बेकायदेशीर रेती उत्कननवर केपे मामलेतदार व कुडचडे पोलीसांची धाड

शेळवण, कुडचडे येथे बेकायदेशीर रेती उत्कननवर केपे मामलेतदार व कुडचडे पोलीसांची धाड. सक्शन पंप व रेती जप्त.

मला नको, मायकल लोबोंना मंत्री करा!

मी जिथे आहे तिथे आनंदी आहे. माझ्या ऐवजी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना मंत्रीपद मिळावे. त्यांना मंत्रीपद मिळाल्यास त्याचा पूर्ण बार्देश तालुक्याला फायदा होईल. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की त्यांनी मायकल लोबोंना मंत्री करावे. साळगांवचे भाजप आमदार केदार नाईकांची मागणी.

श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम आता सांताक्रूझ मतदारसंघात

गोव्यातील अ‍ॅथलेटिक स्टेडियम बांबोळी नव्हे तर सांताक्रूझच्या हद्दीत येते. अ‍ॅथलेटिक स्टेडियम आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम दोन्ही सांताक्रूझ पंचायतीच्या हद्दीत येतात, ताळगाव किंवा बांबोळीच्या हद्दीत नाहीत. सध्या याबाबतीत पुढील कार्यवाहीसाठी काम सुरु आहे. सांताक्रूझ, मर्सेस आणि चिंबेलसाठी हा अभिमानाचा क्षण आहे: पंच इनासिओ परेरा

वाळपई जवाहर नवोदय न्यायालयात पीटेशन दाखल करणार

उत्तर गोव्यातील जवाहर नवोदय विद्यालय वाळपई येथील पालक शिक्षक संघाची आज महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विद्यालयाला भेडसावणाऱ्या विविध समस्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

साखळी रवींद्र भवनतर्फे पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प

साखळी रवींद्र भवनतर्फे पाणी अडवा पाणी जिरवा व बोअरव्हेल या प्रकल्पाचा शुभारंभ अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

मालवाहू रेल्वेच्या धडकेत भावकई येथील वृद्ध महिला ठार

मालवाहू रेल्वेच्या धडकेत भावकई येथील वृद्ध महिला ठार. भावकई-मये येथील रेल्वे रुळावर अपघात. मृत महिला होती गुंगी आणि बहिरी.

कुंक्कळीमधून मॅक्सवेल झेवियर फर्नांडिस याला २५० ग्रॅम गांजासह अटक

मंगळवार (दि.२९) रोजी रात्री उशिरा कुंक्कळी पोलिसांनी मॅक्सवेल झेवियर फर्नांडिस (वय ३०) याला २५० ग्रॅम गांजासह अटक केली

ईव्ही चार्जिंग युनिट्स 50% खर्च सरकार खात्यातून

ईव्ही चार्जिंग युनिट्स उभारण्यासाठी ५०% खर्च सरकार उचलणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com