Gurupasad Pawaskar appeals to Sawant government for political participation of marginalised communities Dainik Gomantak
गोवा

Goa Political News: वंचितांना केवळ लाभार्थी समजू नका, त्यांना सत्तेत भागीदारी द्या; गुरुप्रसाद पावसकर यांचं सावंत सरकारला आवाहन!

Guruprasad Pavaskar commissioner for persons with disabilities: दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या धोरणनिर्मितीपासून निर्णयप्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सहभागी करून घेतल्याशिवाय समान प्रतिनिधित्वाचा उद्देश साध्य होणार नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: लोकशाही व्यवस्था खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक करायची असेल, तर समाजातील वंचित घटकांना केवळ सरकारी योजनांचे लाभार्थी न मानता सार्वजनिक जीवन, प्रशासन आणि निर्णयप्रक्रियेत समान सहभागाची संधी देणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या धोरणनिर्मितीपासून निर्णयप्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सहभागी करून घेतल्याशिवाय समान प्रतिनिधित्वाचा उद्देश साध्य होणार नाही, असे मत राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी व्यक्त केले.

गोव्याच्या (Goa) मुख्य मतदार अधिकाऱ्यांचे कार्यालय, गोवा विद्यापीठ, व्ही. एम. साळगावकर विधी महाविद्यालय आणि आयपीएचबी-गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी लोकशाही’ याविषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेतील दुसऱ्या तांत्रिक सत्रात पावसकर बोलत होते. माजी फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर प्रमुख पाहुणे, तर राजकीय तज्ज्ञ प्रा. पीटर डिसोझा प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा झाली.

सार्वजनिक ठिकाणी सुलभता निर्माण करावी!

पावसकर यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहज आणि स्वतंत्रपणे वावरता यावे, यासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच माहिती व संवाद प्रणाली सर्वांसाठी सुलभ असणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी सुलभता निर्माण करणे ही अतिरिक्त सुविधा नसून लोकशाही प्रशासनाचा मूलभूत भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT