goa Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City : पणजी 'स्मार्ट' समस्यांच्या विळख्यात

Panaji Smart City : एका बाजूला सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे, तर दुसरीकडे मे महिन्यांत डांबरीकरण केलेले रस्ते वाहून गेले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राजधानी पणजी स्मार्ट करण्यासाठी एका बाजूला सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. परंतु जी कामे केली आहेत, त्याचा फायदा होण्यापेक्षा लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

एका बाजूला सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे, तर दुसरीकडे मे महिन्यांत डांबरीकरण केलेले रस्ते वाहून गेले, तर तिसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या मार्केटवरील पत्रे उडून गेल्यानंतरही दुरुस्ती होत नसल्याने इमारतीत पाणी साचण्याचा प्रकार घडत आहे.

पणजी स्मार्ट करण्यासाठी जशी इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) ताब्यात गेली आहे, तशी या शहराला नजर लागली, असेच म्हणावे लागेल. पावसाळ्यात पणजीत प्रामुख्याने समस्यांनी तोंड ‘वर’ काढले आहे. या समस्यांकडे ज्या गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, त्याप्रकारे ते दिले जात नाही.

आल्तिनो येथील मारुती मंदिराजवळ असणाऱ्या सरकारी इमारतीतून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. असाच प्रकार मळ्यातील तारकर मल्टीपर्पज हॉलसमोर स्मार्ट सिटीसाठी नगर विकास खात्याने केलेल्या चेंबरमधून सांडपाणी वाहत आहे. याशिवाय अंतर्गत भागातही अनेक ठिकाणी चेंबर भरून वाहण्याचे प्रकार येथे घडत आहेत.

पावसाळा सुरू झाल्यापासून आजतागायत हे पाणी वाहत आहे. हे सांडपाणी बंद करण्यासाठी कोणताही उपाय योजना महानगरपालिकेने केलेली नाही. याशिवाय पाटो परिसरात गेरा इमारतीसमोर नेहमीप्रमाणे चेंबरमधून सांडपाणी बाहेर येण्याचा प्रकार कायम आहे.

त्याचबरोबर सांतिनेजमध्ये रेजंटा इन प्लासादी दी गोवा हॉटेलजवळही चेंबर भरून सांडपाणी रस्त्यावरून जात आहे. या रस्त्यावर दररोज नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी आणि सरकारी खात्याचे अधिकारी ये-जा करतात.

ज्या-ज्या प्रभागात सांडपाणी रस्त्यावरून वाहण्याचा प्रकार घडत आहे, त्या-त्या प्रभागाचे नगरसेवकही त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही, त्यात अशाप्रकारे सांडपाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहू लागले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

आरोग्य खाते एका बाजूला पावसाळ्यात साथीच्या आजारापासून स्वतःची काळजी घ्या म्हणून नागरिकांना आवाहन करते, तर दुसऱ्या बाजूला या मानवनिर्मित समस्यांचे निराकरणाची जबाबदारी सरकारी यंत्रणाही करीत नसल्याचे चित्र दिसत आहे.

मार्केट इमारतीला गळती

मार्केट इमारतीवरील काही दिवसांपूर्वी पत्रे वाऱ्याने उडाले होते. त्यामुळे मार्केटमध्ये पावसाचे पाणी गळत आहे. पावसामुळे पत्रे दुरुस्ती करण्याचे जोखमीचे काम असल्याने पाऊस थांबल्याशिवाय महानगरपालिका ते करू शकत नाही. तोपर्यंत गळणारे पाणी मार्केटच्या आत प्लॅस्टिक कागद लावून साठविले जात आहे.

सध्या मार्केटच्या आतून इमारतीला प्लॅस्टिकच्या तावदानाचे आच्छादन असल्याचा भास होत आहे. पर्यटकांना पणजीच्या मार्केटचे वंगाळ दर्शन होत आहे. साचलेले पाणी, घाण, ठिकठिकाणी गुटका-तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या, असे सारे चित्र मार्केटमध्ये आहे.

जोपर्यंत एकतर कोणताही फायदा महानगरपालिकेला यातून होत नाही. येथील अनेक विक्रेतेही स्वच्छता पाळत नाहीत. सध्याची गळती व थकलेला करार होत नाहीत तोपर्यंत, ही इमारत बंद ठेवण्याचा पर्याय महानगरपालिकेसमोर आहे.

वाहन चालकांना अपघाताचे निमंत्रण

मे महिन्यात डांबरीकरण केलेला मळा ते तांबडीमाती रस्ता पावसात वाहून गेला आहे. भाटलेतील मशिदीसमोरच्या रस्ता खराब झाला. जुना पणजी-मडगाव जुना मार्ग म्हणजेच सध्याचा मळा फोंताइन्हास या पाटोवरील जुन्या पुलापर्यंतचा रस्त्याची स्थिती बिकट झाली आहे.

खड्डे लाल दगडाने आणि दोन दिवसांपूर्वी डांबर मिश्रित खडीने भरले, पण तेही वाहून गेले आहे. लाल दगडाने भरलेले खड्डे दुचाकीस्वारांना अपघाताचे निमंत्रण देत आहेत. याशिवाय मार्केट परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT