Atal Setu  Dainik Gomantak
गोवा

Panaji Atal Setu: अटलसेतू’ दुरूस्तीवर ‘आयआयटी चेन्नई’ ठेवणार लक्ष

केंद्रीय परिवहन खात्याने जीएसआयडीसीला पुलाच्या पृष्ठभागाची दुरुस्ती करण्यासाठी चार पर्याय सूचविले.

गोमन्तक डिजिटल टीम

IIT Chennai to Keep An Eye On 'Atal Setu' Repair: अटल सेतूच्या दुरुस्तीकामाच्या दर्जाविषयी वारंवार प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

आता या प्रश्‍नाचे मूळ शोधून काढण्याचे काम गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) आयआयटी, चेन्नईला यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

अटल सेतू ३.१ किमी. अंतराचा पूल असून, जीएसआयडीसीने फोंडा ते पणजी मार्गावरील पुलावरील काही ठिकाणच्या पृष्ठभागासाठी वापरलेल्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी आयआयटी चेन्नईला दिलेले आहेत.

केंद्रीय परिवहन खात्याने जीएसआयडीसीला पुलाच्या पृष्ठभागाची दुरुस्ती करण्यासाठी चार पर्याय सूचविले होते.

त्यानुसार पारंपरिक पद्धतीने डांबराचा थर घालण्याचे निश्‍चित केले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी नुकतीच या पुलाची पाहणी करून फोंड्यावरून पणजीला येणारा मार्ग खुला केला होता.

राज्य सरकारने ५८१ कोटी रुपये खर्चून या पुलाची उभारणी केली, पण पुलावरील पडणाऱ्या खडड्यांवर उपाययोजनेत अपयश आले. त्यासाठीच जीएसआयडीसी आयआयटी चेन्नईची मदत घेऊ लागले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT