Goa transport safety news Dainik Gomantak
गोवा

Goa Safety Campaign: महिलांनो, निर्धास्त प्रवास करा; पणजीचा महापौर आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते 'हेल्पलाइन स्टिकर' मोहीम

Helpline Sticker launch: या मोहिमेत राज्याचे परिवहन मंत्री माविन गुदिन्हो हे देखील सामील झाले होते

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे, यावर आळा बसवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणं महत्वाचं आहे. महिला आणि लहान मुलांना शहरात बिनघोर प्रवास करता यावा म्हणून पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी एक अनोखी मोहीम राबवली. या मोहिमेत राज्याचे परिवहन मंत्री माविन गुदिन्हो हे देखील सामील झाले होते. दरम्यान मंत्री गुदिन्हो यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गोव्यात महिला आणि मुलांचे सक्षमीकरण आणि संरक्षण करण्यासाठी गोवा पोलिस आणि स्कॅन गोवा यांच्या संयुक्तविद्यमाने पणजी शहरात एक उपक्रम राबविण्यात आला. प्रवास करत असताना महिला किंवा मुलींना सुरक्षित असं वाटलं पाहिजे बुधवार (दि.२१) रोजी पणजीतील बस, टॅक्सी आणि रिक्षा यावर लोकांच्या सुरक्षितेसाठी हेल्पलाइनचे स्टिकर चिकटवण्यात आलेत.

या स्टिकरवर वेगवेगळे हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत, जेणेकरून मदत पाहिजे असल्यास आवश्यक नंबर डायल केल्याने पोलिसांपर्यंत पाहोचता येतं.

" हे उपक्रम लोकांच्या सुरक्षेसाठी राबवले जातात. जोपर्यंत लोकांना यांसारखे उपक्रम समजणार नाहीत तोपर्यंत गुन्हेगारीच्या घडत राहतील म्हणूनच लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे" असं मंत्री माविन गुदिन्हो म्हणालेत.

फक्त पणजीतच नाही तर संपूर्ण गोव्यात अशा घटना घडू नयेत म्हणून हे उपक्रम राबवले जातायत. याचं एकमेव कारण म्हणजे गोव्यातील गुन्हेगारी कमी करणं आणि गरजू लोकांना मदत मिळवून देणं हेच असल्याचं देखील मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितलं आहे.

या स्टिकरवर महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक नंबर, गोवा पोलिसांचा क्रमांक, सायबर पोलिसांचा क्रमांक अशी महत्वाची माहिती दिली गेली आहे. पणजी शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर हे स्टिकर्स लावण्यात आलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT