
तिसवाडी: गौळेभाट, चिंबल येथील सार्वजनिक विहिरीचे धार्मिक महत्त्व जपण्याचे निर्देश जलदगती जिल्हा न्यायालयाने दिले होते. न्यायाधीश आरतीकुमार नाईक यांनी २०११ मध्ये चिंबल मंचने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला होता. दरवर्षी एप्रिल महिन्यात देवी चिंबलकरीण पालखी माशेल-फोंडा येथून चिंबल गावात येते आणि या सार्वजनिक विहिरीच्या ठिकाणी विविध महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम केले जातात.
ही मालमत्ता एका बिल्डरने खरेदी करून तेथे बांधकाम सुरू केले आहे. बिल्डरने मंजूर बांधकाम आराखड्यात सार्वजनिक विहीर न दाखवता स्थानिक पंचायतीकडून ना हरकत दाखला मिळवला होता. मात्र, वस्तुस्थिती समोर आणली तेव्हा पंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही, म्हणून स्थानिक स्वयंसेवी संस्था चिंबल मंचने ७ मे २०११ रोजी जिल्हा न्यायालयात (Court) याचिका दाखल केली होती.
दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या मागणीला मान्यता देत जमीनमालक व बांधकाम व्यावसायिकांना या विहिरीचे रक्षण करण्याचे निर्देश दिले. या विहिरीच्या पाच मीटरच्या परिघात कोणतेही बांधकाम केले जाणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.