Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पणजीतून अपहरण झालेली 'ती' मुलगी सापडली; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Panaji Kidnapping News: अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पणजी पोलिसांनी पणजी बसस्थानकाच्या आवारात तसेच पणजीतील विविध भागात शोध घेतला.

Sameer Panditrao

पणजी: येथील जीटीडीसी पाटो येथून काल रात्री १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी पणजी पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करून तपास केला असता ती आज संध्याकाळी पाटो परिसरात सापडली आहे. याप्रकरणी या मुलीची जबानी नोंदवण्यात येत असून तिची वैद्यकीय केली जाणार असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.

पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत तेथे तिचे आईवडील मजुराचे काम करतात. पाटो येथे या मजुरांसाठी तात्पुरती शेडवजा खोल्या कंत्राटदाराने बांधून दिल्या आहेत तेथे ते राहतात. बिहारमधील रहिवासी असलेल्या या कुटुंबात त्यांची एक १६ वर्षाची मुलगी होती. ती रात्री खोलीत त्यांच्यासोबत झोपली.

मात्र, मध्यरात्री १ च्या सुमारास ती खोलीत नव्हती. तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी काल संध्याकाळी पणजी पोलिसांत तक्रार दाखल करून अज्ञाताने तिचे अपहरण केल्याचा दावा केला होता. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पणजी पोलिसांनी पणजी बसस्थानकाच्या आवारात तसेच पणजीतील विविध भागात शोध घेतला. आज संध्याकाळी ती पाटो-पणजी परिसरात आढळून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT