Goa Crime: घरातून हाकलले, मोलकरणीचे अपहरण केले; सूत्रधार जनार्दन खोराटेला अटक

Anjuna Home Eviction Case: हणजूण येथील प्रकरण : सुरक्षा एजन्सीची परवानगीही होणार रद्द
Anjuna Home Eviction Case
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सेंट मायकल वाडा-हणजूण येथे बेकायदेशीररीत्या घरात घुसून ब्रॉन्विन सिनारी कुटुंबीयांना घरातून हाकलून लावल्या प्रकरणी क्राईम ब्रँच पोलिसांनी मुख्य सूत्रधार जनार्दन खोराटे याला अटक केली.. पोलिसांनी त्याच्यासह १५ ते २० जणांवर घुसखोरी, धमकी व सामान चोरीप्रकरणाचा गुन्हा नोंदवला होता.

तक्रारदाराच्या मोलकरणीचे अपहरण केल्या प्रकरणाचा नव्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. या प्रकरणाचा गुन्हा हणजूण पोलिसांनी सुरुवातीला दाखल करून तिघा संशयित बाऊन्सर्स संशयित राकेश राहा, परशुराम गावस व विकी नाईक या तिघांना अटक केली होती.

Anjuna Home Eviction Case
Goa Crime: गोव्यात शिवजयंतीला गालबोट; टोळक्याकडून तरुणाला मारहाण, जाण्यास रस्ता मागितल्याने घडली घटना

संशयित खोराटे याने सिनारी कुटुंबीयांना घरातून बाहेर काढण्यासाठी म्हापसा येथील आर्यन सुरक्षा एजन्सीच्या सुरक्षारक्षकांची (बाऊन्सर्स) मदत घेतली होती. मात्र, या सुरक्षा एजन्सीकडे खासगी सुरक्षा एजन्सी नियमन कायद्यानुसार परवानगी नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित प्राधिकरणांना त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी पत्र लिहणार असल्याचे पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले.

सेंट मायकलवाडा येथे ब्रॉन्विन सिनारी यांच्या घरात जबरदस्तीने घुसखोरी करुन हाकलून मुद्देमालाची चोरी करण्यात आल्याची घटना शनिवारी (8 फेब्रुवारी) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. हणजूण पोलिसांनी मुख्य आरोपी (Accused) जनार्दन खोराटेसह अज्ञात 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात सुरुवातील तिघांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर आता यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.

Anjuna Home Eviction Case
Sanguem Town Hall Demolition: ‘टाऊन हॉल’ पाडकाम अर्ध्यावरच! सांगे पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त

दरम्यान, मालमत्तेची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी आपल्याकडे असल्याचा दावा जनार्दन खोराटे याने सिनारी यांच्या घरात घुसखोरी करुन सिनारी कुटुंबीयांना धमकावत घरातील सामान बाहेर फेकून दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com