Glory To Entrepreneurs Dainik Gomantak
गोवा

Panaji News : गोवुमनियाच्या वर्धापनदिनी महिला उद्योजकांचा गौरव

मिरामार येथे झालेल्या या समारंभाला पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्यासह पर्येच्या आमदार दिव्या राणे उपस्थित होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : गोवा गोवुमनियाच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यातील विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंत महिलांचा गौरव करण्यात आला. मिरामार येथे झालेल्या या समारंभाला पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्यासह पर्येच्या आमदार दिव्या राणे उपस्थित होत्या.

गोवुमनियाची कोअर टीम संस्थापक सिया शेख, मधुमती देवी, मोक्ष कोटीयन सिरसाट, कुशा नायक, नाझनी सलफास खान, जस्मीन डिसोझा यांनी १२ हजार महिला उद्योजकांचा समूह बनविण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रितू पुरी, शर्मिला वालावलकर, समृद्धी, रहमत शेख आणि निखत खान यांनी हातभार लावला.

यावेळी महिला उद्योजक उर्वशी गोहील, नादिया अस्लम, मोनिशा जैन, अल्पना काळे, एलिना नाझारेथ मौली मेहता, द्विती भल्ला, चेतना भट, कॅरल फर्नांडिस, करिना अमलानी, धृता रिखे, मेहरून यासीन शेख, मेरीलीन पाऊसकर, अंजली कामत, साफल्या प्रभुदेसाई, समृद्धी धोंड, शीना डिकुन्हा, गार्गी सागरकर,

रितू बहेती, रायझन गोन्साल्वीस, सुरेखा पंडित, निवेदिता बांदोडकर, पूनम मडगावकर, याचिका चोप्रा, प्रिया शेटीया मनस्वी बोर्डेकर, प्रसन्ना कृष्णन, रहिमा तहसीलदार, सुप्रिया रायकर, रिना जैन, सारिका शिरोडकर, एरिका जे. डी. सिक्वेरा, शिवानी बाक्रे, नमिता शरण, हसिना बंदुकारा यांचाही सन्मान करण्यात आला.

पोलिस अधिकाऱ्यांचाही सन्मान

या कार्यक्रमात पाच महिला पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यात अधीक्षक सुनीता सावंत, उपअधीक्षक नूतन वेरेकर, निरीक्षक अनुष्का पै बीर, उपनिरीक्षक जया देसाई आणि हेड कॉन्स्टेबल छाया गोडकर यांचा समावेश होता. शीतल पै काणे, मांगिरीश सालेलकर, एकता अगरवाल आणि मधुमती देवी यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT