Fire Bridage Dainik Gomantak
गोवा

Fire Bridage : आग प्रतिबंधक ज्ञान, कौशल्य सहकाऱ्यांनाही शिकवावे : रायकर

Fire Bridage : गोव्यातील अग्निशमन दलाच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पश्‍चिम बंगाल, दिल्ली तसेच दमण व दीव या राज्यातील सुमारे २९ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. ५ महिन्यांचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Fire Bridage :

पणजी, अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रात घेतलेल्या प्रशिक्षणातील ज्ञान व कौशल्य आपल्या सहकाऱ्यांनाही देखील शिकवावे. त्याची इतरांशी देवाण - घेवाण करावी असे आवाहने दलाचे संचालक नितीन रायकर यांनी राज्याबाहेरील या प्रशिक्षणार्थी उपअधिकाऱ्यांच्या ५१ व्या तुकडीच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या समारोप समारंभात बोलताना केले.

गोव्यातील अग्निशमन दलाच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पश्‍चिम बंगाल, दिल्ली तसेच दमण व दीव या राज्यातील सुमारे २९ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. ५ महिन्यांचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यामध्ये आगीला सामोरे जाण्यापासून ते विविध प्रकारची उपकरणे हाताळण्यासंदर्भातचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल संचालक नितीन रायकर यांनी समाधान व्यक्त केले.

गोवा राज्य अग्निशमन दल प्रशिक्षण केंद्र हे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर, गृह मंत्रालय, सरकारचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून नियुक्त केलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना गोव्यातील या केंद्रात प्रशिक्षण दिले जाते.

पाच महिन्याच्या कालावधीत प्रशिक्षणार्थींना अग्निशमन विभागाच्या सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले. यामध्ये प्रतिबंध आणि संरक्षण उपाय, विशेष सेवा, अग्निशमन सेवा प्रशासन, फायर सर्व्हिस हाऊस, पंप ऑपरेशन व इतर अनेक विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT