Fighter Jet Attack Simulation Dainik Gomantak
गोवा

Fighter Jet Attack Simulation: गोव्यात UFO? मध्‍यरात्री कानठळ्या, हृदयात धडकी भरवणाऱ्या आवाजचे रहस्य काय?

Fighter Jet Attack Simulation: ‘तो’ नव्हता गडगडाट; होता फायटर जेट सराव; नौदलाचा खुलासा

गोमन्तक डिजिटल टीम

Fighter Jet Attack Simulation

पणजीसह ताळगाव, दोनापावल व मेरशी या भागांत मंगळवारी मध्यरात्री बॉम्बवृष्टीप्रमाणे हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या आणि कानठळ्या बसवणाऱ्या ढगांच्या गडगडाटासारखा आवाज झाला.

मध्यरात्री साखरझोपेत असलेले अनेक लोक या आवाजाने जागे झाले अन् काय घडतेय, याचा अंदाज घेऊ लागले. या विषयावर सोशल मीडियावर बुधवारी अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. मात्र, रात्रीचा तो आवाज फायटर जेट विमानांच्या सरावाचा होता, असा खुलासा नौदल विभागाने केल्यानंतर या आवाजाचे रहस्य उलगडले.

जगभरात अनेक वर्षापासून युद्धजन्य स्थिती आहे. त्यामुळे कधी उठून लढाऊ विमाने येतील अन् कोण कुणावर बॉम्ब टाकेल, याचा भरवसा नाही. अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात सततच्या बॉम्बवृष्टीमुळे तेथील भौगोलिक चेहरामोहराच बदलला आहे.

त्यामुळे काल मंगळवारी मध्यरात्री २ वाजता पणजी, कारंजाळे, टोंक, ताळगाव, दोनापावल, मेरशी तसेच आसपासच्या भागातील लोकांना जेटच्या इंजिनच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने जाग आली.

मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने बहुतांश लोक साखर झोपेतच होते. पण थोड्या वेळाने हा आवाज बंद झाला, मात्र लोकांच्या मनात धाकधूक तशी होतीच. त्यामुळे आवाजाने जागे झालेला प्रत्येकजण एकमेकाला या कानठळ्या बसवणारा आवाज आपणही ऐकला का, असे विचारत होते, तर काहीजण आपापल्या परीने तर्कवितर्क लढवत होते.

लढाऊ विमाने अवकाशात सराव करत असल्याचा अंदाज लोकांना नसल्याने आपल्यावर हल्ला होत होता का? काही अज्ञात धोका रोखण्यासाठी लढाऊ विमानांनी आकाशात झेप घेतली होती का? असे अनेक प्रश्न विचारणारे असंख्य पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. नौदलाने युद्धाभ्यासाचा सराव केला होता. यास ‘फायटर जेट अटॅक सिम्युलेशन’ म्हटले जाते. नौदलाने याची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.

एखाद्यावेळी युद्धजन्य स्थिती उद्‍भवलीच तर काय करावे, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा युद्धअभ्यास सराव होता, असे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.

‘एलियन’च्या चर्चांनाही उधाण

या कानठळ्या बसवणाऱ्या फायटर जेटच्या आवाजामुळे सोशल मीडियावर मात्र लोकांनी अनेक कॉन्सपीरसी थियरीजचा पाऊस पाडला. कोणी आपल्याला जे वाटले ते विचार मांडले. कोणी भूतलावर एलियन अवतरल्याचे व ते कामाचा ताण करण्यासाठी गोव्यात येत आहेत, असेही कॉमेन्ट्स टाकण्यात आले.

दरवर्षी पहाटेच्या सुमारास वॉकिंग पार्कमध्येही याबबत चर्चा हॉट होती, मात्र याबाबत उत्तर कुणाकडेच नव्हते. अखेर नौदलाने या घटनेचा खुलासा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT